मुतखडा फुटून लघवीद्वारे बाहेर पडू शकतो हा आहे रामबाण उपायमुतखडा ची समस्या आजकाल सामान्य होत चालली आहे. पूर्वी मुतखडा झालेल्या रुग्णांची संख्या फारच कमी होती परंतु आता या आजाराच्या विळख्यात अनेकजण अडकले आहेत. या आजारामध्ये रुग्णाला असह्य वेदना सहन कराव्या लागतात.
स्‍टोन -
कॅल्शियम फॉस्‍फेट, कॅल्शियम ऑक्सोलेट, यूरिक अ‍ॅसिड, आणि अमोनियम फॉस्‍फेट यासारख्‍या रसायनापासून स्‍टोन तयार होतो. जड पाणी आणि क्षारयुक्‍त पाण्‍यापासून तयार झालेले पदार्थ आहारात घेतल्‍यानंतर किडणी स्‍टोन होण्‍याचा धोका जास्‍त असतो.

किडणी स्‍टोनचे लक्षणे-
पोटात आचानक कळ निघणे. सातत्‍याने पोट दूखणे. जळजळ होणे. उलटी होणे. लघवीसोबत रक्‍त येणे याला हिमेटूरिया म्‍हटले जाते. वारंवार लघवी येणे ही स्‍टोन होण्‍याची लक्षणे आहेत.

किडनी स्टोनपासून दूर राहण्याचे उपाय
1. आहारात प्रोटीन, नायट्रोजन तसेच सोडियमचे प्रमाण कमी असावे.

2. चॉकलेट, सोयाबीन, पालक याचे जास्त सेवन करू नये.

3. गरजेपेक्षा जास्त कोल्ड्रिंकचे सेवन नुकसानदायक ठरू शकते.

4. व्हिटॅमिन-सी जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करावे

5. फळांचे ज्यूस (रस) जास्त प्रमाणात घेतल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका कमी राहतो.

किडनी स्‍टोन दूर करणारे प्राचीन उपाय

1. दररोज एक गाजर खाल्ल्याने मुत्रपिंडात अडकलेला स्टोन बाहेर पडेल.

2. तुळशीच्या बिया, शहाजीरा, खडीसाखर आणि दुध एकत्र करून घेतल्यास मुतखडा बाहेर पडतो.

3. जिरे, खडीसाखर आणि मधासोबत खाल्ल्यास किडनी स्टोन फुटून लघवीद्वारे बाहेर पडतो.

4. महिन्यातून पाच दिवस एक चमचा ओवा पाण्यातून घ्यावा.

5. आंब्याची पाने सावलीत वाळवून घेऊन त्याचे बारीक चूर्ण तयार करून घ्या. दररोज आठ ग्रॅम चूर्ण पाण्यातून घेतल्यास लाभ होईल.


या उपायांनीसुद्धा किडनी स्टोन दूर होऊ शकतो

1.शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्ल्यास किडनीतील स्टोन फुटून बाहेर पडू शकतो.

2.पिकलेले जांभूळ खाल्ल्यास किडनी स्टोनच्या आजारात आराम मिळेल.

3.आवळ्याचे चूर्ण घेतल्यास लाभ होईल.

4.किडनी स्टोन झालेल्या रुग्णांनी टोमॅटोचे सेवन कमी प्रमाणात करावे.

5.दिवसातून कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी प्यावे.


लघवी करताना जळजळ होत असेल तर गुळवेल आणि आवळ्याचे मिश्रण तयार करा. यामध्‍ये आदरक पाच ग्रॅम, अश्वगंधा पाच ग्रॅम टाका. हे मिश्रण 100 मिली लीटर पाण्‍यात उकळून घ्‍या. हा काढा दोन दिवसाच्‍या आंतराने दोन महिने प्‍यायल्‍यानंतर किडणी स्‍टोन बरा होतो.


मुतखडा दूर करण्यासाठी -
तुळशीचे पाने उकळून काढा तयार करून घ्या. या काढ्यामध्ये मध टाकून नियमित सहा महिने याचे सेवन केल्यास मुतखडा लघवीद्वारे बाहेर पडेल. हा सोपा आणि अचूक उपाय आहे.

थोडे नवीन जरा जुने