एक विलायाची तुमची कमजोरी दूर करेल
वेलदोडे ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या फळास वेलची, वेलदोडा, विलायची इलायची किंवा एला असेही म्हणतात. विलायची हा मसाल्याचा एक प्रकार आहे. फार कमी लोकांना हे माहिती असावे की, विलायची भरपूर औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यामुळे आज आम्ही तुम्हाला विलायचीचे काही घरगुती सोपे औषधी उपाय सांगत आहोत...

अ‍ॅसिडिटीच्या त्रासामध्ये विलायची खूप प्रभावकारी औषध आहे. अ‍ॅसिडिटी झाल्यास एक विलायची खाल्यास लगेच आराम मिळेल.
एक विलायची, एक अद्रकाचा तुकडा, लवंग आणि तुळशीचे पाच पानं विड्याच्या पानात टाकून खाल्यास सर्दीत आराम मिळेल.


घशात खरखर होत असल्यास सकाळ-संध्याकाळ एक विलायची चावून-चावून खावी आणि त्यावर लोमट पाणी प्यावे.
तोंडातील दुर्गंधीची समस्या असेल तर, दररोज जेवण झाल्यानंतर एक विलायची खाल्यास ही समस्या समाप्त होईल.


चक्कर येत असेल किंवा मळमळ होत असेल तर लगेच एक विलायची तोंडात टाका. आराम मिळेल.
नपुंसकता दूर करण्यासाठी बदाम(एक, दोन), चारोळ्याचे दाणे (२ ग्रॅम) आणि तीन विलायची एकत्र कुटून घ्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाचे सेवन केल्यास नपुंसकता दूर होईल.


थोडे नवीन जरा जुने