पिंपल्समुळे त्रस्त आहात ? हे करा
पिंपल्स ही खुप सामान्य समस्या आहे. जी मोठ्या प्रमाणात टिनएजर्समध्ये दिसते. तरुणपणात काही हार्मोनल बदल होत असतात. यामुळे चेहर्‍यावरील तेलीय ग्रंथी जागृत होतात आणि या ग्रंथींवर बॅक्टेरिया अटॅक करतात.

या व्यतिरिक्त जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने, कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्सचा जास्त वापर किंवा अनुवंशिकता आणि धुळीच्या अ‍ॅलर्जीमुळे पिंपल्स येतात. आज आम्ही तुम्हाला पिंपल्स नष्ट करण्याचे काही खास घरगुती उपाय सांगत आहोत.
1 - हळद

हळद अँटीसोप्टिकचे काम करते. यामुळे यामध्ये बॅक्टेरिया संपवण्याची क्षमता असते.
उपाय - एक चमचा हळद पावडर घ्या आणि घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट पिंपल्सवर लावा. काही मिनिट राहु द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धूवुन घ्या. एक आठवडा असे करा. पिंपल्स नष्ट होतील.

2 - लिंबु
पिंपल्ससाठी लिंबु फायदेशीर आहेत. लिंबुमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते.
उपाय - दोन मध्यम आकाराचे लिंबु घेऊन ज्युस तयार करा. या ज्यूसमध्ये कॉटनचा कपडा भिजवून चेहर्‍याला लावा आणि थोड्यावेळाने थंड पाण्याने चेहरा धुवुन घ्या. दिवसातुन दोन वेळा तीन-चार दिवस हा उपाय केल्यास पिंपल्स नष्ट होण्यास मदत होईल.


3 - लसुन
लसुनमध्ये अँटीफंगल तत्व असतात. यामुळे पिंपल्स लवकर दुर होतात.
उपाय - लसणाच्या दोन पाकळ्या आणि एक लवंग बारीक करून घ्या. ही पेस्ट फक्त पिंपल्सवर लावा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.


4- बर्फ
पिंपल्स नष्ट करण्यासाठी बर्फाचा वापर केला जाऊ शकतो.
उपाय - बर्फाचा तुकडा कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन चेहर्‍यावर लावा. तीन-चार दिवस दिवसातुन दोन वेळा चेहर्‍यावर लावल्याने पिंपल्स नष्ट होतील.
5 - वाफ
वाफ पिंपल्स नष्ट करण्यासाठी चांगला उपाय आहे. चेहर्‍यावर वाफ घेतल्याने रोम छिद्र उघडतात. यामुळे चेहर्‍यावरील घाण नष्ट होते.
उपाय - जेव्हा पिंपल्स होतील तेव्हा दिवसातुन दोन वेळा चार-पाच दिवस वाफ घ्या. या उपायाने पिंपल्स नष्ट होतील आणि चेहरा चमकू लागेल.
6 - संत्र्याची साल
संत्र्याची साल चेहर्‍यासाठी फायदेशीर असतात. संतर्‍याच्या साली सावलीत वाळवुन त्याची पावडर बनवा.
उपाय - ही पावडर कमी पाण्यामध्ये मिसळुन चेहर्‍यावर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा धुवून घ्या. दिवसातुन दोन-तीन वेळा हा प्रयोग करा.


7 - पपई
पपईमध्ये सर्वात जास्त अँटीऑक्सीडेंट असतात. यामध्ये पिंपल्स लवकर संपवण्याची क्षमता असते.
उपाय - एक पपई मिक्सरमधून बारीक करून ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. पपईचा ज्युससुध्दा चेहर्‍यावर लावाता येईल. पंधरा ते वीस मिनिट चेहर्‍यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.


8 - पुदीना

1. पुदीना शरीराली शितल ठेवते. सोबतच यामध्ये अँटीसोप्टीक गुण असतात.
2. पुदीन्याची काही पाने मिक्सर मधुन काठुन घ्या.
3. ही पेस्ट रात्री झोपण्याआधी चेहर्‍यावर लावा किंवा ज्युस बनवुन लावा. हे रात्रभर चेहर्‍यावर लावुन ठेवा.
4. सकाळी चेहरा धुवून घ्या. आठवड्यातुन एक वेळा हे करा. पिंपल्स हळुहळू नष्ट होतील.थोडे नवीन जरा जुने