तुम्ही रागीट आहात ? फक्त एक मिनिट हे करा रागीटपणा पळून जाईल
प्रातःकाळी स्नानादीतून निवृत्त होऊन आसन अंथरून शक्यतो पद्मासन किंवा सुखासनात बसावे. ५-१० दीर्घ श्वास घ्यावेत आणि हळूहळू सोडावेत.


त्यानंतर शांत चित्ताने बसून पुढील मुद्रा दोन्ही हातांनी कराव्यात. विशेष अत्यावश्यक परिस्थितीमध्ये या मुद्रा केव्हाही करू शकता. या मुद्रेचे नाव ज्ञान मुद्रा असे आहे.

कृती -
तर्जनी अर्थात पहिले बोट वाकवून त्याच्या टोकाला अंगठ्याच्या टोकाचा स्पर्श करावा. बाकीचे तिन्ही बोटे सरळ ठेवावीत.

लाभ -

मानसिक रोग जसे की, अनिद्रा अथवा अति निद्रा, कमजोर स्मरणशक्ती, रागीट स्वभाव इत्यादींमध्ये ही मुद्रा अत्यंत लाभदायक आहे. ही मुद्रा केल्याने पूजा-पाठात, ध्यान-भजनात मन लागते. दररोज ३० मिनिटे या मुद्राचा सराव केला पाहिजे.थोडे नवीन जरा जुने