ताणतणावामुळे नैराश्यात आहात का? जाणून घ्या उपायविविध प्रकारच्या हृदयरोगानंतर नैराश्य हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा आजार होऊ घातला आहे. मेंदूमधील रसायनांचा समतोल बिघडणे हे नैराश्याचे प्रमुख कारण आहे. त्यापैकी सिरोटोनिन हे सर्वात महत्त्वाचे रसायन (न्यूरोसिकल) आहे. मेंदूच्या विशिष्ट भागात सिरोटोनिनचे प्रमाण कमी झाल्यास नैराश्याची लक्षणे उद्भवतात.
मेंदूमधील दोन मज्जापेशी (न्यूरॉन) जेथे जोडल्या जातात, त्या सांध्यामधील न्यूरोट्रान्समीटर हे संदेशवहनाचे काम करतात. हे संदेशवहन बिघडणे हे मनोविकारांचे प्रमुख कारण आहे.
काहीवेळा धक्कादायक अथवा क्लेशदायक घटनेनंतरही नैराश्य उद्भवू शकते. एखाद्या व्यक्तीला पूर्वी कधीतरी नैराश्याचा आजार होऊन गेला असेल तर आयुष्यातील प्रतिकूल प्रसंगांनंतर हा आजार पुन्हा उलटू शकतो. प्रतिकूल परिस्थितीत मेंदूमधील रसायनांचा समतोल बिघडतो. या परिस्थितीत सुधारणा झालेली असली तरी हा समतोल बिघडलेलाच राहतो. नैराश्य पुन्हा उद्भवल्यास तो कारणीभूत ठरतो.
उपचार :
नैराश्य (उदासीनता) या आजारावर मुख्यत्वे औषधोपचार अथवा सायकोथेरपीद्वारे उपचार केले जातात. आजाराचे प्रमाण गंभीर अवस्थेत गेल्यास ईसीटी उपयुक्त ठरते. सध्या या आजारावर अतिशय परिणामकारक औषधी उपलब्ध आहे. मुख्यत्वे एसएसआरआय तसेच एसएनआरआय प्रकारात मोडणार्‍या या औषधीने साधारणत: तीन आठवड्यांत नैराश्याची बरीचशी लक्षणे आटोक्यात येतात; पण पूर्ण बरे वाटल्यानंतरही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार बंद करू नये.
सायकोथेरपीमध्ये त्या व्यक्तीच्या नैराश्याला कारणीभूत ठरणारी विचारपद्धती वा धारणा यावर चर्चा केली जाते. रोग्याच्या मनातील दु:ख समजून घेतल्याने, त्याचा आत्मविश्वास जागृत केल्याने नैराश्याची तीव्रता कमी होते. अशा रीतीने नैराश्य हा जरी आयुष्याचा बेरंग करणारा आजार असला, तरी मनोविकारतज्ज्ञ सल्ल्याने व औषधोपचाराने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. जीवन पुन्हा आनंददायी बनू शकते, यात शंका नाही.

दैनंदिन जीवनात वाढते ताणतणाव, ढासळणारी नीतिमूल्ये, एकत्र कु टुंबपद्धतीचा र्‍हास इत्यादी कारणांमुळे नैराश्य या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारणत: 10 टक्के लोकांना या आजाराने ग्रासलेले दिसून येते.
नैराश्य किंवा उदासीनता या आजारांची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
कायम उदास किंवा निराश वाटणे
आनंददायक गोष्टी उदा. वाचन, टीव्ही पाहणे, खेळणे, गप्पा मारणे इत्यादीतील आनंद नाहीसा होतो.

सतत थकवा जाणवणे, झोप येणे.

भूक मंदावणे, वजन कमी होणे

भविष्य अंधारमय आहे, जगण्यात अर्थ नाही असे वाटणे

आत्महत्येचा विचार मनात येणे

वारंवार रडू येणे, डोकेदुखी- अंगदुखी इत्यादी.थोडे नवीन जरा जुने