उपचारांचा वापर करून तुम्ही दिर्घकाळ या आजारांपासून दूर राहाल




लवकर थकवा येणे, सांधेदुखी, दृष्टीदोष हे सर्व म्हतारपणाचे आजार आहेत. या आजारांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपचार सांगितले आहेत. या उपचारांचा वापर करून तुम्ही दिर्घकाळ या आजारांपासून दूर राहू शकाल.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक तरूण अकाली म्हातारपणात होणार्‍या आजारांच्या गराड्यात सापडतात. वेळेआधीच केस पांढरे होणे, अशक्तपणा वाढणे, लवकर थकवा येणे, सांधेदुखी, दृष्टीदोष हे सर्व म्हातारपणाचे आजार आहेत.
या आजारांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपचार सांगितले आहेत. या उपचारांचा वापर करून तुम्ही दिर्घकाळ या आजारांपासून दूर राहू शकता.

दररोज आवळ्याचे रस, गायीचे तुप, मध व मिश्री प्रत्येकी 15-15 ग्रॅम घेऊन मिश्रण बनवावे. सकाळी भुकेल्या पोटी याचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासापर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून तुम्ही दूर राहाल. हा उपाय तारूण्यावस्था दिर्घकाळ टिकवण्यासाठी एकदम मस्त उपाय आहे.

दररोज डाळींबाचे सेवन करण्यानेही म्हतारपणातील आजार दूर होतात आणि तारूण्यावस्था दिर्घकाळ राहते. डाळींबाचे सेवन रक्तासंबंधीच्या अनेक आजारांपासून शरीराला वाचवते. तसेच रक्तातील कमतरता दूर करण्यासाठी याचा फायदा होतो.

लक्षात ठेवा, या उपचारांना सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

संतुलित आहार घ्या...

दररोज संतुलित आहार घ्यावा. आहार असा घ्या जो पचण्यास हलके असावे आणि ज्याचा शरिराच्या पाचनसंस्थेवर वाईट परिणाम होवू नये. खाण्यात विटामिन, प्रोटीन आणि खनिज तत्वांचे जास्तीत जास्त प्रमाण हवे. बाहेरचे खाद्य, तेल, तुप, आणि गोड पदार्थ खाण्यापासून वाचा...

तणावापासून दूर राहा...
तणावापासून दूर राहा. ज्या व्यक्ती जास्त विचार करतात आणि खुप ताण घेतात, त्यांना म्हतारपणातील अनेक आजार तारूण्यावस्थेतच व्हायला लागतात. जर मानसिक ताण जास्त असेल तर चांगल्या मित्रांमध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवा. चांगले संगीत ऐका, चांगली पुस्तके वाचा, यामुळे तुमचा मानसिक ताण दूर होण्यास मदत होईल. जर तणाव दूर झाला तर अनेक रोगांपासून तुम्ही वाचाल...


लसूनचा वापर

शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी लसूनच्या दोन पाकळ्या गिळाव्यात आणि त्यानंतर थोडे पाणी प्यावे. असे नियमित करण्याने अशक्तपणाच्या समस्येपासून तुम्ही लवकर बाहेर याल.

आवळ्याचा वापर
शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याच्या चुर्णात मिश्री वाटून मिसळावी. या मिश्रणाला दररोज एक चमचा या मात्रेत रात्री झोपण्याच्या पहिले सेवन करावे. यानंतर थोडे पाणी प्यावे.

आवळ्याचा मुरंबा नियमित घ्यावा त्यामुळेही शरिरातील अशक्तपणा कमी होतो.


पांढर्‍या मुसळीचा वापर

अशक्तपणा दूर करण्यासाठी याचे नियमित सेवन करावे. पांढर्‍या मुसळी अथवा धोली मुसळीचे चुर्ण बनवावे. हे चूर्ण एक चमचा आणि एक चमचा वाटलेली मिश्री एकत्र करून घ्यावी. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्या आधी कोमट दुधासोबत याचे सेवन करावे. असे केल्याने शरिराला शक्ती मिळते आणि सर्व दैनंदिन कार्य करण्यासाठी शरिराला उर्जा मिळते.

साय आणि मिश्रीचा उपाय
दुधाची साय आणि वाटलेली मिश्री यांना एकत्र करून याचे नियमित सेवन करावे. असे केल्याने अशक्तपणा दर होतो आणि दिर्घ कालावधीसाठी शरीरात शक्ती राहते. तसेच चेहर्‍यावर तेज येते.


या गोष्टी लक्षात ठेवा -

दररोज झोपेकडे लक्ष द्या. झोप कमी होण्याने अनेक आजार होतात. दररोज कमीतकमी 6 ते 8 घंटे झोपणे आवश्यक आहे.

सकाळी लवकर उठायला हवे आणि रात्री योग्यवेळी झोपयला हवे.

दिवसा अथवा संध्याकाळी झोपू नका. जर कोणी आजारी आहे अथवा वृद्ध आहे, तर अशा व्यक्तीने दिवसा झोपलेले चालेल. मात्र तरूण आणि निरोगी माणसाने दिवसा झोपू नये. अवेळी झोपल्यानेही अनेक आजार होऊ शकतात.
दररोज सकाळी व्यायाम करावा. योगासनाने म्हतारपण दूर राहते. शरीर निरोगी आणि उर्जावान बनते. सकाळी सकाळी फिरणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.


थोडे नवीन जरा जुने