जेवणानंतर हे पदार्थ खात असाल तर सावधान
जेवण टेस्टी असेल तर जेवणारा व्यक्ती त्या चवीमध्ये हरपून जातो. तो हेही विसरून जातो की, जेवणाचेसुद्धा काही नियम आहेत. जेवताना काही खास गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर याचा वाईट प्रभाव पडू शकतो.

त्यामुळे संतुलित आहार घेण्यावर नेहमी जोर दिला जातो. तसेच आहाराच्या कॉम्बिनेशनचीसुद्धा माहिती आवश्यक आहे, म्हणजे कोणत्या पदार्थांसोबत काय खावे आणि काय खाऊ नये.

आयुर्वेदामध्ये अशा अनेक पदार्थांचे वर्णन आढळून येते, जे एकत्रितपणे खाणे हानिकारक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही शरीराला अपायकारक ठरणाऱ्या फूड कॉम्बिनेशनची माहिती देत आहोत.

दुधासोबत दही
दुधासोबत दही खाणे शरीरासाठी खूप हानिकारक आहे. दुध आणि दह्याचा गुणधर्म वेगवेगळा आहे. हे दोन्ही पदार्थ एकत्रितपणे खाल्ल्यास पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.चिकनसोबत मिठाई

चिकनसोबत ज्यूस किंवा मिठाईचे एकत्रितपणे सेवन करू नये. यामुळेसुद्धा पोट बिघडण्याची शक्यता राहते.

कोल्ड्रिंकनंतर पान मसाला
कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर किंवा पिण्यापूर्वी पेपरमेंटयुक्त पान मसाला खाण्यापासून दूर राहावे. कोल्ड्रिंक आणि पेपरमेंट मिसळल्यास सायनाइड तयार होते, जे विषाप्रमाणे काम करते.

बटाटे आणि भात
अनेक लोक बटाटा आणि भात चवीने खातात, परंतु हे दोन्ही पदार्थ एकत्रितपणे खाऊ नयेत. हे दोन्ही पदार्थ एकत्रितपणे खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.


कांदा आणि दुध
कांदा आणि दुध कधीही एकत्रितपणे खाऊ नये. कांद्यासोबत दुध घेतल्यास विविधप्रकारचे त्वचा रोग निर्माण होऊ शकतात. उदा. खाज, सोरायसिस, एग्जिमा इ. आजार होण्याची शक्यता राहते.


दही आणि मासे

दह्याचा गुणधर्म थंड आहे. हे कोणत्याही गरम पदार्थासोबत खाऊ नये. मासे गरम गुणधर्माचे आहेत. यामुळे दही आणि मासे एकत्रितपणे खाऊ नयेत. यामुळे गॅस, एलर्जी, त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. दह्यासोबतच मधसुद्धा गरम गुणधर्म असलेल्या पदार्थांसोबत खाऊ नये.


जेवणासोबत फळे खाऊ नयेत
आयुर्वेदानुसार जेवणासोबत फळं खाऊ नयेत. दोन्ही पदार्थांच्या कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचे पाचन तंत्र वेगवेगळे असते. लिंबू, संत्री, अननस इ. आंबट फळं अॅसिडिक असतात. हे दोन्ही पदार्थ एकत्रितपणे खाल्ल्यास कार्बोहायड्रेट किंवा स्टार्चची पचनक्रिया मंद होते. यामुळे बद्धकोष्ठता, डायरिया किंवा अपचनशी समस्या निर्माण होऊ शकते.


उडदाच्या डाळीसोबत दही
उडदाच्या डाळीसोबत दही खाणे टाळावे. असे मानले जाते की, या पदार्थांचे एकत्रितपणे जास्त सेवन केल्यास हृदयाशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात.


दुधासोबत खाऊ नये लिंबू
दुधासोबत लिंबू किंवा खारट-आंबट पदार्थ खाणे आरोग्यासाठी खूप नुकसानदायक ठरते. हे दोन्ही पदार्थ एकत्रितपणे खाल्ल्यास एसिडिटी होऊ शकते.


थोडे नवीन जरा जुने