ही लक्षणे दिसल्यास समजून जा, मधुमेह आपल्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न करतोय
31 कोटी मधुमेह रुग्ण आहेत भारतात, जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार. दरवर्षी यात मोठी वाढ होत आहे. काही लक्षणांकडे लक्ष दिल्यास आपल्याला कळेल की मधुमेह आपल्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. मधुमेह होण्यापूर्वी शरीर आपल्याला असे काही संकेत देतो, ते वेळीच ओळखून आपण मधुमेहाचा सामना करण्यासाठी सज्ज होऊ शकतो.
1. जास्त तहान लागणे : 

जास्त प्रमाणात किंवा वारंवार तहान लागणे मधुमेहाचे लक्षण असते. मधुमेह झाल्यावर व्यक्तीचे मूत्रपिंड जास्तीत जास्त ग्लुकोज तयार करते. अशाने व्यक्तीच्या शरीरात पाणी कमी होण्यासोबत व्यक्तीला तहान लागते. म्हणून जर जास्त प्रमाणात आणि वारंवार तहान लागत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

2. वजन कमी होणे :
तीन ते चार महिन्यांच्या काळात अडीच ते तीन किलो वजन कमी होणे मधुमेहाच्या शक्यतेकडे इशारा करते. असे होण्यामागचे कारण म्हणजे आपले शरीर पुरेशा प्रमाणात ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचवू शकत नाही. परिणामी, वेगाने वजन कमी होऊ लागते.

3. जास्त भूक लागणे :

वारंवार भूक लागण्याची समस्यादेखील मधुमेहाचे एक धोकादायक लक्षण असू शकते. शरीरात रक्तातील शुगरचे प्रमाण घटू लागते, तेव्हा व्यक्तीच्या भुकेत वाढ होते. शरीरातील पेशींना पुरेशा प्रमाणात शुगर न मिळाल्याने ऊर्जा मिळत नाही. ही गरज पूर्ण करण्यासाठी शरीराला अतिरिक्त आहाराची गरज लागते आणि भूक वाढते.

4. त्वचेचा त्रास :

त्वचेला होणारी खाज, दाग आणि दाह यासारख्या समस्यादेखील मधुमेहाकडे इशारा करतात. विशेषत: गळ्यावर सुरकुत्या पडल्या किंवा लाल डाग पडल्यास समजावे की, मधुमेहाचा धोका आहे. इन्सुलिनचे वाढते प्रमाण याचे कारण असते.


5. आळशीपणा :

शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने अशक्तपणा जाणतो. अशा परिस्थितीत दिवसभर आळशीपणाचा अनुभव येतो. तसेच शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यावरही शरीराची ऊर्जा कमी होते. त्यामुळे थकवा जाणवतो.

6. अंधुक दृष्टी :

अचानक किंवा कधी कधी अंधुक दिसण्याची समस्यादेखील मधुमेहाचा इशारा देते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांतील बाहुल्यांचा आकार बिघडतो. यामुळे पाहण्यासाठी त्रास होतो. साखर नियंत्रित झाल्यास सामान्यपणे दिसू लागते.


थोडे नवीन जरा जुने