'हा' योगा करा आणि तणाव कायमचा दूर करा
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तणाव जास्त प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत तणाव दूर करण्यासाठी आयंगर योगा सहायक ठरतो. तसेच यामुळे तन आणि मन निरोगी राहते.


प्राचीन पद्धतीच्या योगासनांमध्ये काही नवीन तंत्रांचा समावेश करून योग प्रशिक्षक बीकेएस आयंगर यांनी ‘आयंगर योगा’ची रचना केली आहे. या योग पद्धतीच्या मदतीने तुम्ही तणावमुक्त आणि स्फूर्तीयुक्त जीवन जगू शकता.


काय आहे आयंगर योगा?

200 पारंपरिक योगासने आणि 14 विविध प्रकारचे प्राणायाम एकमेकांशी जोडत त्यांना आधुनिक रंग देऊन आयंगर योगा ही नवी योग पद्धती विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये बेल्ट, ब्लॉक किंवा ब्लँकेट यासारख्या वस्तूंचा वापरही योग्य आसन करण्यासाठी सतत करावा लागतो.


का आहे वेगळा?
आयंगर योगा पद्धत इतर पद्धतींपेक्षा तंत्र, क्रमवारी आणि टायमिंगमुळे वेगळी ठरते. यामध्ये शरीराच्या संरचनेच्या (अलाइनमेंट) सूक्ष्मतेवर लक्ष दिले जाते. सोबतच प्राणायाम करण्याच्या पद्धतींवरही विशेष लक्ष दिले जाते.


येथे क्रमवारी म्हणजे योग आणि श्वसनक्रियेच्या व्यायामाच्या क्रमावर लक्ष देणे होय. याद्वारे मनासारखे निष्कर्ष मिळवण्यासाठी क्रम पाळणे खूप आवश्यक आहे.


आसन योग्य पद्धतीने आणि क्रमानेच करणे गरजेचे नाही, तर योग्य टायमिंगदेखील आवश्यक आहे. म्हणजे कोणते आसन किती वेळेपर्यंत करायचे आहे, हेदेखील निश्चित केले पाहिजे.उभ्या मुद्रेवर लक्ष

आयंगर योगामध्ये उभ्या मुद्रांवर (उभे राहून केला जाणारा व्यायाम) जास्त लक्ष दिले जाते, जेणेकरून पायांना बळकटी मिळेल आणि शरीराचा रक्तप्रवाह, समन्वय तथा संतुलन चांगले ठेवता येईल.


रोगनिवारक

आयंगर योगा आरोग्यासाठी फायदेशीर आहेच, पण याच्या माध्यमातून अनेक आजारांवर उपचारही केले जाऊ शकतात.

क्रॉनिक बॅक पेन (पाठीचा त्रास).

इम्युनोडिडेफिशियन्सी (शरीराच्या एखाद्या भागात प्रतिरोधक तंत्राचे काम न करणे).

उच्च् रक्तदाब.

निद्रानाश.

उदासी.

मोनोपॉज.

याशिवाय इतर अनेक शारीरिक व्याधीदेखील दूर होतात.थोडे नवीन जरा जुने