रक्ताभिसरण वाढवण्यासाठी करा आणि चमत्कार पहा
स्नायूमधील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. मात्र हे स्ट्रेचिंग करून वाढवता येते.स्ट्रेचिंग करताना शरीरातील सर्व अवयवांमध्ये समन्वय वाढवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या व्यायामामुळे गुडघे दुखण्याचा त्रास कमी होतो.

छाती/ खांदे
जमिनीवर पाय दुमडून बसावे आणि दोन्ही हात मागच्या बाजूला घ्यावे. आता कमरेवरील शरीराचा हिस्सा पुढे झुकवा. काही सेकंदांनंतर सामान्य स्थितीत परत यावे.


खांदे
एक दंड छातीच्या दुसर्‍या टोकाकडे न्या आणि दुसर्‍या हाताने कोपरा पकडा. अशा प्रकारे दंडाला ओढण्याचा प्रयत्न करावा. दुसर्‍या हातानेसुद्धा ही प्रक्रिया करावी.
ट्रायसेप्स

दोन्ही हात डोक्याच्या वर घेऊन कोपर्‍यावर मजबूत पकड मिळवा. ओढ देण्याचा प्रयत्न करावा.


वरील सर्व स्ट्रेचिंग दोन ते तीन वेळा करावे आणि प्रत्येक प्रकार दहा ते तीस सेकंदांपर्यंत करावा. जर वरील प्रकार करताना काही त्रास होत असल्यास तत्काळ व्यायाम थांबवावा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा.


थोडे नवीन जरा जुने