हे करा 5 मिनिटातच सर्दी गायब झालीच पाहिजे
आपण स्वंयपाक करताना जि-याचा वापर हा फोडणी देण्यासाठी करतो. पण याशिवाय जि-यामध्ये औषधी गुणदेखील आहेत. ताप आल्यानंतर जर घरगुती औषधे तुम्ही घेत असाल तर तुम्हाला जि-याचा फायदा होऊ शकेल.


तुमचे वाहते नाक यामुळे अगदी काही मिनिटांमध्ये वाहणे थांबेल. जिरे फंगस आणि बॅक्टेरियापासून संरक्षण करतात. यामुळे शरिराची इम्यून सिस्टम ताकदवान होण्यास मदत होते.
जि-यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे सर्दी-ताप होण्यापासून बचाव होऊ शकतो.

जाणून घ्या, सर्दी-ताप झाल्यानतर जिरे कसे खावे याबद्दल...

1.ताप आल्यावर जि-याचा वापर कसा करावा -
दोन कप पाण्यात एक चमचा जिरे टाकून उकळावे. पाणी उकळ्यावर त्यात बारीक केलेले अद्रक आणि तुळशीचे पान टाकावे. हे टाकल्याने किटाणू नष्ट होण्यास मदत होते. पाणी गार झाल्यावर ते गाळून घ्यावे आणि प्यावे.

सर्दी झाल्यास पाण्यात जिरे टाकून त्याची वाफ घेतल्यास फरक पडतो. यामध्ये थोडी लवंग टाकावी. यामुळे तुमचे बंद नाक मोकळे होण्यास मदत होईल. जि-याची वाफ घेतल्यानंतर थोड्यावेळ डोके चादरीने झाकावे. वाफ घेतल्यानंतर लगेच हवेचा संपर्क झाल्यास छातीमध्ये कफ होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वाफ घेतल्यानंतर लगेच हवेत जाऊ नये.

ही सावधानी घ्या :
वर सांगण्यात आलेले उपाय हे घरगुती असून याने फरक पडत नसल्यास डॉक्टराचा सल्ला घ्यावा.


दूध आणि हळद :
तुम्हाला जर तापात थंडी वाजत असेल तर, रात्री झोपताना गरम दुधात थोडी हळद टाकून पिल्यास बरे वाटेल. हे घेतल्याने खोकला बरा होण्यास मदत होते.

हळद :
हळद गरम असल्याने शरिरात होण्या-या इंन्फेक्शन्सशी लढण्यास मदत करते. हळद एखाद्या जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येण्यास मदत होते.
दुध:
दुधात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी असते. यामुळे हाडे मजबुत होण्यास मदत होते. तसेच आजारांपासून रक्षण करण्यास मदत करते.

हा उपाय तुम्ही दिवसातुन एकदा केल्यास आराम मिळेल. एका ग्लासमध्ये अर्धा चमचा हळद टाकावी.


लिंबू, दालचीनी आणि मध:
ताप अथवा सर्दी झाल्यास लिंबू, दालचीनी आणि मध एकत्र करून याचे पाणी पिल्यास आराम मिळेल.
तयार करण्याचा विधी:
एका भांड्यात मध टाकून तो पातळ होईपर्यत उकळावे त्यानंतर त्यात दालचिनी आणि लिंबू टाकावे.
मध : मध गरम असल्याने त्यात ऍटीऑसीडेंट्स असतात. याने इम्यून सिस्टिम मजबुत होण्यास मदत होते.
लिंबू: यामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे घेतल्याने ताप बरा होण्यास मदत होते.
दालचिनी: यामुळे ब्लड ग्लूकोज़ लेवल कंट्रोल ठेवण्यास मदत होते. हे इम्यूनिटी वाढवण्यास मदत करते.


आवळा :
रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्यास ताप,सर्दी, आणि खोकला यापासून आराम मिळण्यास मदत होते. आवळा कोणत्याही ऋतुत होणा-या आजारांसाठी अतिशय उत्तम आहे. आवळ्यामुळे लिव्हर आणि ब्लड सर्कुलेशन योग्य राहण्यास मदत होते. आवळ्यात व्हिटॅमिन सी असल्याने ताप बरा होण्यास मदत होते. रोज़ 4-5 आवळ्याच्या फोडी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तब्येत चांगली राहण्यास मदत होते. तसेच, रोज़ सकाळी दुधासोबत मुराब्बा खाल्यासही फायदा होतो.

थोडे नवीन जरा जुने