जेवण केल्यानंतर लगेच ही कामे करू करू नका नाहीतर हे होतील परिणाम




निरोगी शरीरासाठी प्रत्येक व्यक्ती काळजी घेत असतो. ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु जेवण केल्यानंतर कोणकोणती कामे करू नयेत याकडे कदाचित कोणी लक्ष देत नाही.


तुमच्या मनात कधी हा विचार आला आहे का, जेवण झाल्यानंतर लगेच कोणती कामे करण्यापासून दूर राहावे. काही लोकांना माहिती असावे परंतु या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात.
याचे दुष्परिणाम त्यांना भविष्यात भोगावे लागू शकतात. ब-याच लोकांना जेवणानंतर काही चुकीच्या गोष्टी करण्याची सवय असते ज्या भावी आयुष्यात त्याच्या तब्येतीसाठी धोक्याचे कारण ठरू शकतात.

जेवणात कितीही पौष्टीक पदार्थ असले तरी जेवताना ते नीट पध्दतीने खाल्ले न गेल्यास ते न खाल्याच्या बरोबरीचेच ठरते. तुम्हाला देखील तुमचे शरीर सुदृढ हवे असल्यास काही वाईट गोष्टी कायमच्या सोडणे तुमच्या फायद्याच्या ठरू शकतात.

धूम्रपान करू नये...
सिगारेट पिणे तसे शरिरासाठी धोक्याचेच मानले जाते पण ब-याच जणाना जेवणानंतर लगेचच सिगारेट पिण्याची सवय असते. अभ्यासु व्यक्तीच्यामते जेवनानंतर लगेच सिगरेट पिल्याने अन्न पचन व्यवस्थित होत नाही. काही जणाना जेवणानंतर सिगरेट अथवा तंबाखु खाण्याची तलब लागते पण अशा प्रकारे जेवणानंतर लगेच अशा पदार्थाचे सेवन केल्यास गैसेस आणि अ‍ॅसिडिटी सारखा त्रास होण्याची शक्यता असते.


जेवणानंतर लगेच फळे खाऊ नये ...
जेवणानंतर लगेच फळांचे सेवन केल्यास खाल्लेले अन्न अन्ननलिकेत अडकुन बसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण सेवन केलेले अन्न व्यवस्थितरित्या आपल्या शरिराच्या आत पोहचत नाही. या कारणामुळे आपली तब्येत खराब होवून आपण खालेले अन्न आतमध्येच सडु शकते. त्यासाठी जेवणाच्या एक तास आधी अथवा जेवनानंतर एका तासाने फ़ळाचे सेवन करणे आपल्या शरिरासाठी योग्य ठरू शकते. महत्वाचे म्हणजे रिकाम्यापोटी जर फळांचे सेवन केल्यास दिवसाची सुरूवात करण्यासाठी आवश्यक असणारी योग्य ती ऊर्जा शरीरास मिळण्यास मदतशीर ठरू शकते.


अधिक चहा टाळावा....
प्रमाणाच्या बाहेर चहाचे सेवन शरिरासाठी हानिकारक ठरू शकते. चहाच्या पानामध्ये अ‍ॅसिड मोठ्याप्रमाणात आढळून येत असल्यामुळे जेवणानंतर लगेच चहाचे सेवन करणे टाळावे. या अ‍ॅसिडमुळे अन्नात असलेल्या प्रोटिनला धोका निर्माण होवून खाल्लेले अन्न पचवण्यासाठी त्रास होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जर जेवणानंतर चहाचे सेवन करायचे असल्यास साधारण एका तासानंतर केलेले शरिरासाठी योग्य ठरू शकते.

बेल्ट ढील्ला करू नये....
स्वादिष्ट जेवण म्हटले कि जेवणावर यथेश्च ताव मारणारे आपण पाहिले आहेत. समोर ठेवलेले जेवण आपल्या आवडीचे असल्याने काही व्यक्ती जेवणाआशी पॅन्टला लावलेला बेल्ट (कबर पट्टा) सैल करतात. हे करण्यामागचा मुख्य उद्देश असा असतो कि, जर आपण बेल्ट लूज (ढिल्ला) केल्यास आपल्याला जेवण भरपुर प्रमाणात जाईल. पण असे जेवणाच्याआधी करणे तब्येतीसाठी धोक्याचे ठरू शकते.
असे म्हटले जाते, की असे केल्याने शरीरातील आतडे ब्लॉक होवून प्रमाणाच्या बाहेर अन्नाचे सेवन केले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवणाआधी बेल्ट लूज करू नये. शक्यतो आपल्याल्या जेवढी भुकअ आहे त्यापेक्षा थोडेसे कमी खाणे केव्हाही शरिरासाठी योग्य ठरू शकते.

स्नान करू नये...
जेवणानंतर लगेचच स्नान केल्याने हात आणि पाय यामधील रक्त पुरवठा जलद गतीने सुरू होतो. असे केल्याने पोटात हव्या असलेल्या रक्ताचा पुरवठा कमी होवुन शरीराची डायजेस्ट सिस्टीमवर ताणपडुन ती कमजोर होण्याचा धोका निर्माण होवु शकतो.


वॉक करू नये...
डॉक्टराच्यामते शरीरासाठी चालणे (वॉक) करणे लाभदायक आहे. पण, जेवणानंतर लगेचच चालणे पचनक्रियेत अडथळा निर्माण करू शकतो.

साधारण जेवण झाल्यानंतर अर्ध्यातासाने चालणे शरीरास फायदेशीर ठरते. साधारण जेवल्यानंतर 20-30 मिनिटे चालल्यास पोटाच्या तक्रारी होण्याचा धोका नसतो.



थोडे नवीन जरा जुने