पाच मिनटे हे करा कंबरही लवचीक होईल
अर्द्धसलभासन केल्याने पोटाच्या खालच्या भागाच्या स्नायूंना खास बळकटी मिळते. यामुळे कंबरही लवचीक होते.
असे करा
जमिनीवर पोटावर झोपा. दोन्ही पाय एकमेकांना चिकटलेले असावे.
पायाची बोटे मागे आणि तळवे आकाशाकडे असले पाहिजे. हात बगलेला चिकटलेले थेट मागच्या बाजूला असावे. मुठी बंद ठेवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.

डोके थोडे वर उचलत हनुवटी जमिनीला टेकवा.

उजवा पाय गुडघे न वाकवता हळूहळू वर उचला. जेवढे वर नेता येईल तेवढे घेऊन जा.

काही वेळ या स्थितीत राहा. आता हळूहळू जुन्या स्थितीत या.

हीच प्रक्रिया दुसऱ्या पायानेदेखील करा.


थोडे नवीन जरा जुने