सकाळी दोन मिनिट हे करा हाडांच्या रोगापासूनही मुक्ती मिळेल !
सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी तयार होण्याची क्रिया वेगाने होते. व्हिटॅमिन डीमुळे अनेक आजारापासून सुटका मिळते.
सूर्यप्रकाशाची किरणे ही निसर्गाचे असे वरदान आहे, जे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे ठरते. शरीरात व्हिटॅमिन डी योग्य पद्धतीने कार्यरत राहावे यासाठी सूर्यप्रकाश अत्यंत महत्त्वाचा असतो. शरीरात व्हिटॅमिन डी सक्रिय झाल्याने चयापचय प्रक्रिया सुधारते. तसेच अनेक आजारांचा सामना करण्याची शक्ती मिळते.
400 इंटरनॅशनल युनिट(आययू) व्हिटॅमिन डी ची गरज असते एका सामान्य व्यक्तीला दिवसभरात

80 टक्के भारतीय पुरुष, महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते.

58 टक्के भारतीयांना वाटते की व्हिटॅमिन डी आणि सूर्यकिरणांमध्ये काही तरी संबंध असतो.

कर्करोगापासून बचाव

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे डॉक्टर फ्रॅँक आणि कॅड्रिक गॅरलँडने एक संशोधन केले होते. यानुसार शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्यास स्तन आणि मोठय़ा आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. सूर्यप्रकाश यापासून रक्षण करतो. खासकरून हिवाळ्यातील दिवसात मिळणारा सूर्यप्रकाश. आहारातून आपण जे व्हिटॅमिन डी घेतो ते योग्यपद्धतीने शोषले जाण्यासाठी ऊन मदत करते.

स्मृतिभ्रंशात फायदेशीर

दिवसभर काही प्रमाणात उन्हात राहणे अल्झायमर पीडितांसाठी फायद्याचे ठरते. उन्हात फिरल्याने अल्झायमर पीडितांना झोप न येणे,आळस, मळमळ असा त्रास होत नाही.


हाडांच्या रोगापासून संरक्षण

यॉन्सी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीनचे डॉ. यॉग्न यांच्या मते लहान मुलांचे कमकुवत हाडाच्या आजारापासून रक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन डीचा आहार घेण्यापेक्षा उन्हात बसणे जास्त फायदेशीर उपाय आहे.


किती ऊन गरजेचे

हंगामानुसार शरीराला लागणार्‍या उन्हाची गरज कमी जास्त होते. सामान्यत: एका व्यक्तीने सकाळी 20 मिनिटे उन्हाच्या संपर्कात राहिले पाहिजे. वय वाढण्यासोबत याचे प्रमाणदेखील वाढते.थोडे नवीन जरा जुने