हे करा एका महिन्यात 5 किलो वजन कमी होईल
प्रत्येक जण वजन कमी करण्याच्या मागे लागलेला आहे. शरीर चांगले दिसण्यासह आरोग्यासाठीही वजन कमी करणे योग्य आहे, परंतु हे ‘पी हळद अन् हो गोरी’ या म्हणीप्रमाणे ते लगेच शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला व्यायामासह आहाराचीही योग्य योजना आखावी लागेल.

स्लीम-ट्रीम बनण्याचा प्लॅन

नवीन वर्षाच्या सुरुवातीला, ‘या वर्षी तर मी वजन कमी करूनच गप्प बसेन’ असा संकल्प करणारे अनेकजण असतात. लग्नसराईच्या काळात चांगले दिसण्यासाठी धडपड करणे असो किंवा क्रॅश डाएटिंग, कधीही घाईघाईत वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नये. डॉक्टरांकडे एका महिन्यात 10 किलो वजन कमी करण्याच्या अपेक्षा घेऊन अनेक लोक जात असतात, परंतु त्यांची ही अपेक्षा योग्य नाही. त्याचे थेट परिणाम आरोग्यावर होतात. एका महिन्यात जास्तीत जास्त पाच किलो वजनच योग्य पद्धतीने कमी केले जाऊ शकते. यासाठीसुद्धा व्यायामासह उत्तम आहाराची योजना आखणेही अत्यावश्यक आहे. योग्य आहार हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

एक पाउंड म्हणजे 3500 कॅलरीज

एक पाउंड वजनाचा अर्थ किती कॅलरीज आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. एक पाउंड म्हणजे 3500 कॅलरीज. म्हणजेच तुम्हाला जर एका आठवड्यात एक पाउंड वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आहारातील 3500 कॅलरीज कमी कराव्या लागतील. तुम्हाला तुमच्या आहारावर जास्त लक्ष द्यावे लागेल.

दररोज 500 कॅलरीज घटवा

तुम्हाला पहिल्या आठवड्यात 3500 कॅलरीज जाळायच्या आहेत. म्हणजेच त्यासाठी एका दिवसात कमीत कमी 500 कॅलरीज वजन कमी करावे लागेल. डॉक्टरांनी तुम्हाला कॅलरीज कमी करण्याचा सल्ला दिला तर खाणेपिणेच सोडून द्यावे असा त्याचा अर्थ होत नाही. 250 कॅलरीज योग्य आहाराद्वारे कमी करा आणि उर्वरित 250 कॅलरीज व्यायामाच्या माध्यमातून कमी करा. भोजनात जंक फूड बंद करून ब्रेड, बटर यांचे प्रमाणही कमी करा.

45 मिनिटांचे व्यायाम सत्र

दररोजचे तुमच्या व्यायामाचे सत्र किमान 45 मिनिटांचे असायला हवे.

जर रोज व्यायाम करणे शक्य नसेल तर आठवड्यातून किमान चार दिवस तरी व्यायाम करावा.

45 मिनिटांच्या व्यायामात दररोज एकाच प्रकारचा व्यायाम करण्याची गरज नाही. तुम्ही जिम, पोहणे, घरातील दैनंदिन कामकाज यांचाही त्यात समावेश करू शकता.थोडे नवीन जरा जुने