तुम्ही छोट्या- छोट्या गोष्टी विसरून जाता?




तुम्ही छोट्या- छोट्या गोष्टी विसरून जाता? एखादी महत्वाची गोष्ट तुम्ही विसरलात असे झाले आहे का? काही लोकांना विसरण्याचा आजार असतो. एखादी गोष्ट लक्षात आल्यानंतर आपण एवढी महत्वाची गोष्ट कशी विसरलो याचा ते विचार करत बसतात.


आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही छोटे घरगुती उपाय .काही ब्रेन फूडस्. खाल्ल्याने अल्झायमर्ससारखा रोग होत नाही. तसेच मेंदूची शक्‍तीसुध्‍दा वाढते.

टोमॅटो-
आंबट-गोड टोमॅटो जेवणाची चव वाढवतो. टोमॅटोमध्ये प्रोटीन, विटामिन, स्निग्ध पदार्थांचे गुण असतात.यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते. टोमॅटोमध्ये लायकोपिन असते. हे शरीराचे फ्री रॅडीकल्सपासून रक्षण करते. हे मेंदूतल्या पेशींचे नुकसान होण्यापासूनदेखील वाचवते.

अक्रोड-

रोज अक्रोड खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वांची वाढ होते. सोबतच तब्येतीच्या अनेक समस्या दूर होतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3, फॅटी अ‍ॅसिड्स, प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर समाविष्ट असतात. रोज थोडे अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.

स्ट्रॉबेरी-

स्ट्रॉबेरी आपल्या मनमोहक सुगंधामुळे जगभरात लोकप्रिय आहे. स्ट्रॉबेरीचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. स्ट्रॉबेरी मिल्क शेक, आइस्क्रीमच्‍या स्वादात भर घालते. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडंट आढळतात, जे स्मृतीभ्रंशाचा धोका दूर करतात.

ऑलिव्ह-
हे नुसतंच आपल्या स्वास्थ्यासाठी नाही तर चेहर्‍यासाठी देखील लाभदायक ठरते. यात मोठ्या प्रमाणावर फॅटस् असतात. त्यामुळे हे स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करते.

दही-

दह्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, खनिज, लवण, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. दह्याच्या नियमित सेवनाने अनेक फायदे होतात. हे शरीरात लाभदायक जीवाणुंची वाढ करतात आणि हानिकारक जीवाणुंना नष्ट करतात. यामध्‍ये अमायनो अ‍ॅसिड आढळते, ज्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि स्मरणशक्ती वाढते.

जायफळ -
जायफळ आपल्‍या विशेष स्वाद आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. जायफळमध्‍ये डोकं स्वस्थ ठेवण्यासाठी मदत करणारे तसेच स्मरणशक्ती वाढवणारे गुण असतात.


तुळस-

तुळशीला हिंदू धर्मात देवीचे स्थान दिले आहे. तुळशीचा मसाल्याच्या रूपातदेखील वापर केला जातो. ही अनेक आजारांत औषधीचे काम करते. दररोज तुळशीची 2-4 पाने खाल्ल्याने विस्‍मरणाचा आजार दूर होतो.

जवस-
जवसाच्या बीमध्ये खुप प्रोटीन आणि फायबर असते. हे खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते.


चहा-

चहात आढळणारे पॉलीफिनॉलमुळे मनाचे संतुलन राखण्यास मदत करते. हे मनाची शांतता आणि एकाग्रता वाढवते. ग्रीन टीमध्ये भरपूर गुण असतात. यात अधिक प्रमाणात अँटीऑक्सीडंट सापडतात. याच्या नियमित सेवनाने शरीर स्वस्थ राहते. दिवसातून दो ते तीन कप ग्रीन टी प्यायल्याने स्मरणशक्ती वाढते.

केशर-
केशर एक असा मसाला आहे जो जेवणाचा स्वाद दुप्पट वाढवतो. केशरचा उपयोग झोप दूर करणार्‍या गोळ्यांमध्ये केला जातो. याच्या सेवनाने मेंदू ऊर्जावान राहतो.


हळद-
हळद मेंदूसाठी एक चांगली औषधी आहे. ही फक्त जेवणाचा स्वाद आणि रंगात भर घालत नाही तर डोकं शांत आणि स्वस्थ ठेवते. याच्या नियमित सेवनाने अल्झायमर रोग होत नाही. मेंदूतल्या खराब पेशींना दुरूस्त करण्याचे काम करते.

दालचीनी-
अल्झायमरच्या रोग्यांसाठी दालचीनी हे जबरदस्त औषध आहे. दालचीनीच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढते आणि डोकं स्वस्थ राहते.


अजवाइनची पाने-

दर तुम्ही तुमच्या जेवणाला वेगळा फ्लेवर देऊ इच्छिता तर अजवाइनच्या पानांचा उपयोग करावा. अजवाइनची पाने शरीराला स्वस्थ आणि तरूण ठेवायला मदत करतात. तसेच या पानांत मुबलक प्रमाणात अँटीऑक्सीडंट आढळतात. हे डोक्यासाठी औषधी म्हमून काम करतात. यामुळे अरोमा थेरपीतदेखील याचा वापर केला जाते.

काळीमिरी-
काळीमिरीमध्ये पेपरिन नावाचे रसायन असते. हे रसायन शरीर आणि मेंदूतल्या पेशींना शांत करते. डिप्रेशनमध्ये हे रसायन जादूप्रमाणेच काम करते. तसेच मेंदूला स्वस्थ ठेवण्यासाठी काळीमिरीचा उपयोग केला जातो.
थोडे नवीन जरा जुने