कमजोरी दूर करण्याचा हा सोपा उपाय तुम्हाला माहित आहे का ?
आरोग्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी औषधांसोबतच हीलिंग (रोगनिवारक) फायदेशीर माध्यम ठरते. हीलिंग ही एक प्रक्रिया असून ती व्यक्तीला मानसिकरीत्या कोणत्याही आजाराचा सामना करण्याची शक्ती देते.

 साधारणत: हीलिंग प्रक्रिया शारीरिकदृष्ट्या (रेकी किंवा टच थेरपीद्वारे) केली जाते. मात्र, काही खाद्य पदार्थांच्या मदतीनेसुद्धा शरीराचे रोगनिवारण केले जाऊ शकते.

उपाय जाणून घेण्यासाठी -

आल्याची मदत होईल
हिवाळ्यामध्ये थकवा आणि आळस जाणवणार्‍या लोकांसाठी आल्याचा चहा पिणे हीलिंगचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आल्याचा चहा पिल्याने शरीराच्या नर्व्हज कार्यक्षम होतात. यामुळे दिवसभराचा थकवा आणि आळस दूर करणे सोपे जाते. हिवाळ्यात पोटाचा त्रास होणार्‍यांनी एक चमचा आले, अर्धा चमचा सुंठ टाकलेला चहा पिल्यास आराम मिळेल.
पत्ताकोबी फायदेशीर
अशक्त आणि कमी वजन असलेल्या लोकांसाठी पत्ताकोबी हीलिंगचे अत्यंत चांगले माध्यम ठरते. एक वाटी पत्ताकोबीत 34 कॅलरीज, 3 ग्रॅम फायबर आणि दिवसभरासाठी लागणारी 30 टक्के जीवनसत्त्वे असतात. पत्ताकोबी सालाडच्या रूपात सेवन केल्याने जास्त भूक लागते. अशक्त लोकांसाठी पत्ताकोबी सुपर फूडचे काम करते.


बीटमुळे आरोग्य चांगले राहील
इतर सालाडच्या तुलनेत बीट अत्यंत चांगले रोगनिवारक फळ आहे. यात मोठय़ा प्रमाणात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व आढळून येते. त्याचबरोबर कॅल्शियम आणि लोहाची गरज पूर्ण करण्यासाठीही याचे सेवन केले जाऊ शकते. यात आढळून येणारी नैसर्गिक साखर तत्काळ ऊर्जा देण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.


शेंगभाज्या गुणकारी

कर्करोग निवारणासाठी शेंगभाज्यांचे सेवन करणे फायद्याचे ठरते. शरीराच्या पेशींमध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यासाठी शेंगभाज्या फायदेशीर आहेत. हरभरा, राजमा आणि सर्व प्रकारच्या डाळींचा रोजच्या आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.


नाशपाती फायदेशीर
नाशपाती फळाचे सेवन करणे हृदयासाठी फायदेशीर ठरते. तसेच यामुळे वाईट कोलेस्टेरॉल अत्यंत वेगाने कमी होतो आणि हृदयाला अतिरिक्त हीलिंग मिळते. एका साधारण आकाराच्या नाशपाती फळात पाच ग्रॅम फायबर आढळून येते. हे फायबर शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलला विरघळण्याचे काम करते.


वेदना कमी होतील: लिंबाचा रस कापसाला लावा. नंतर हा कापूस मधमाशी चावलेल्या जागेवर लावा. वेदना कमी होतील.


सूज कमी होईल : टी-बॅग पाण्यात बुडवा. नंतर ती पाच ते सात मिनिटांपर्यंत डोळ्यांवर ठेवल्याने सूज कमी होईल.


रक्तदाब नियंत्रित राहील : एक कप दुधी भोपळ्याचा रस सकाळी अनशापोटी पिल्याने उच्च् रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते.


पोटदुखी थांबेल : पोटात अचानक मुरडा आल्यास हिंग आणि आले मिसळून खावे. यामुळे पोटदुखीचा त्रास थांबेल.


सर्दीतून होईल सुटका : दररोज जेवणात लसणाच्या अध्र्या पाकळीचा समावेश केल्याने सर्दी कमी होते. कोलेस्टेरॉल कमी होणे, हृदयविकार रोखण्यातदेखील मदत होते.


दुखण्यातून सुटका : दोन चिमटी केसर दुधात टाकून पिल्याने सांध्याच्या दुखण्यात आराम मिळतो. केसर शरीरातील लॅक्टिक अँसिडला कमी करतो.


नर्व्हज सिस्टिम सुधारेल : रात्री खजूर दुधात भिजवून ठेवा आणि सकाळी खावेत. असे केल्याने शरीरातील पोटॅशियम वाढून सोडियम कमी होते. असे झाल्याने नर्व्हज सिस्टिम सुधारते.


पचनासाठी उपयोगी : पपईच्या दोन फोडी रिकाम्यापोटी खाल्याने पचनप्रणाली योग्य राहते. पपईमध्ये असणारे हाय न्यूट्रीन वजन कमी करणार्‍या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरते.


तणावात उपयुक्त : व्हिटॅमिन्स सी चे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणे लाभदायी असते. कारण तणाव झाल्यास शरीरातील याचे प्रमाण घटते.


त्वचा उजळेल : व्हिटॅमिन्स ईच्या कॅप्सूलचे लिक्विड काढून त्यात दही, मध, लिंबूचा रस मिळून चेहर्‍यावर लावावे.
भूक लागेल : कढीपत्ता पानाचा वापर खाद्य पदार्थात केल्याने भूक वाढते. त्याच प्रमाणे याचा सुंगध मेंदूला भुकेची जाणीव करण्यास प्रोत्साहित करतो.


कमी होईल कोलेस्ट्रेरॉल : नाष्ट्यामध्ये एक वाटी ओटमील खाल्याने एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच वजन कमी होण्यास मदत होते.थोडे नवीन जरा जुने