तुमचं लिव्हर फिट आहे का? असे ओळखा..लिव्हर( यकृत )आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हर खराब झाल्यास शरीराची कार्य करण्याची क्षमता नसल्याप्रमाणेच राहते. तुम्ही तुमच्या आहारात येथे सांगण्यात आलेल्या 4 पदार्थांचा समावेश करून एक ते तीन महिन्यात लिव्हरचे आजार उदा. फॅटी लिव्हर, liver cirrhosis, liver fibrosist ठीक करू शकता.
पपई
पपई, लिव्हरच्या आजारांवरील सर्वात सुरक्षित नैसर्गिक उपचारांमधील एक आहे, विशेषतः लिव्हर सिरोसीससाठी. दररोज दोन चमचे पपईच्या रसामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून घ्या. या आजारापासून पूर्णपणे ठीक होण्यासाठी नियमितपणे या मिश्रणाचे तीन ते चार आठवडे करा.
आवळा -
आवळा व्हिटॅमिन 'सी' असलेल्या संपन्न स्रोतांमधील एक असून याचे सेवन लिव्हरची कार्यशीलता कायम ठेवण्यास मदत करते. एका रिसर्चनुसार आवळ्यामध्ये लिव्हरला सुरक्षित ठेवणारे सर्व तत्त्व उपलब्ध आहेत. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून 4-5 आवळे अवश्य खावेत.


सफरचंदचे व्हिनेगर -
सफरचंदपासून तयार केलेले व्हिनेगर लिव्हरमध्ये असलेले सर्व विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात. जेवण करण्यापूर्वी सफरचंदचे व्हिनेगर घेतल्यास शरीरावरील चरबी कमी होते. सफरचंदचे व्हिनेगर तुम्ही विविध प्रकारे उपयोगात आणू शकता, एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सफरचंदचे व्हिनेगर मिसळून यामध्ये एक चमचा मध टाका. हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळेस घ्या.


इडलिंबू
एक इडलिंबू (चांगले पिकलेले) घेऊन त्याचे दोन तुकडे करून घ्या. त्यानंतर अर्ध्या लिंबामधील बिया काढून ते चार पाकळ्याच्या आकाराचे कापून घ्या. त्यानंतर एका भागामध्ये काळ्या मीरेचे चूर्ण, दुसऱ्या भागात काळे मीठ, तिसऱ्या भागात सुंठ चूर्ण आणि चौथ्या भागात बारीक साखर भरून हे लिंबू प्लेटमध्ये झाकून ठेवा. सकाळी जेवणाच्या एक तास अगोदर हे अर्धे लिंबू मंद आचेवर गरम करून यातील रस चोखून घ्या. शंभर ग्रॅम पाण्यामध्ये उरलेल्या अर्ध्या लिंबाचा रस टाकून हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस घ्या. या उपायाने लिव्हरच्या समस्या दूर होतील.


दोन आठवडे साखर किंवा इतर गोड पदार्थांचे सेवन करू नका. गोड दुध पीत असाल तर दुधामध्ये साखर न टाकता चार-पाच मनुका टाकून घ्यावे. पोळी कमी खावी. सर्वात उत्तम म्हणजे हे उपचार चालू असताना पोळी खाउच नये, भाज्या आणि फळांचे जास्त सेवन करावे.

भाज्यामध्ये जास्त मसाला टाकू नये. टोमॅटो, पालक, कारले, भोपळा इ. भाज्यांचे आणि पपई, आवळा, सफरचंद या फळांचे सेवन करावे तसेच ताक घ्यावे. तूप आणि तेलात तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करावे.


थोडे नवीन जरा जुने