सर्दीकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर
देशात दम्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी आपल्या नियमित दिनचर्येशी निगडित अनेक बाबी कारणीभूत आहेत. त्यातही सर्वात मोठे कारण आहे वेगाने वाढणारे प्रदूषण.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, देशात सद्य:स्थितीत दम्याचे 1 कोटी 30 लाख रुग्ण आहेत आणि 2025 पर्यंत जवळपास 10 कोटी लोक दम्याने पीडित असण्याची शक्यता आहे. लहान मुलेही वेगाने दम्याची शिकार होत आहेत.

सर्दीकडे दुर्लक्ष करू नका :

हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. 15 वर्षांच्या वयापासून सुरू होणार्‍या या आजाराचे सर्वात मोठे कारण आहे, त्याची लक्षणे केवळ सर्दी-पडसे मानून त्याकडे दुर्लक्ष करणे. त्यामुळे तीच सर्दी पुढे जाऊन दम्यात रूपांतरित होते.
अनेकवेळा विशेषत : मुलांना दम लागण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, त्यांच्या लक्षात येत नाही. मुलांवर वेळीच उपचार केल्यास संभाव्य धोक्यापासून बचाव होऊ शकतो.

रेडिओ वेव्ह सर्जरी : ज्या रुग्णांना दम्याचा झटका येतो, त्यांच्यासाठी रेडिओ वेव्ह सर्जरी साहाय्यभूत ठरू शकते. ती श्वासोच्छ्वासात येणारे अडथळे दूर करून श्वास घेणे सोपे करते.
या शस्त्रक्रियेस एक तास लागतो. ती पुढील जीवन सहज सोपे करते. ज्यांच्यावर औषधांचा परिणाम होत नाही, अशा लोकांवर ही शस्त्रक्रिया केली जाते.


थोडे नवीन जरा जुने