मुलांच्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करु नका नाहीतर हे परिणाम होतीलमधुमेह, हायपर टेंशन, हृदयविकाराचा धोका लठ्ठपणामुळेच वाढतो. आज जगात 2.2 कोटी मुले लठ्ठपणाने त्रस्त आहेत. या समस्येचा सामना करण्यासाठी डिस्नी कंपनीने जंक फूडला चालना देणार्‍या जाहिरातींच्या विरोधात मोहीम चाक आहार घेण्यासाठी असे प्रोत्साहन देऊ शकतात..
स्तनपान -
गरोदर महिला घेत असलेला आहार तिच्या दुधात रूपांतरित होतो. अशावेळी बाळ अन्न खायला सुरुवात करते तेव्हा तो पौष्टिक अन्न खाण्यास नकार देत नाही.


पौष्टिक पदार्थ खावे -
आहारात फळ आणि भाज्यांचा समावेश करा आणि जंक फूडपासून नेहमीच दूर राहा. गरोदर महिला जंक फूडचे सेवन करत असेल तर तिचे होणारे बाळही तसेच करेल, असे एका संशोधनात आढळले आहे.


वैविध्य राखा -
जर मुलाने अन्न खाण्यास नकार दिला तर त्याला ते पसंत नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. अनेकवेळा खाद्यपदार्थ पाहता क्षणी आवडला नाही तरी असे होऊ शकते. त्यामुळे नेहमी आहारात वैविध्य ठेवावे.


सोबत जेवण करावे -
ज्या मुलांवर पौष्टिक पदार्थ खाण्यासाठी दडपण आणले जाते, ती मुले हळूहळू हट्टी व्हायला लागतात. अशावेळी त्यांना कधीही शिक्षा करू नये. तसेच पौष्टिक पदार्थ खाल्ल्यावर मुलांचे कौतुक करा आणि बक्षीस म्हणून चॉकलेट किंवा एखादी वस्तू द्या.


थोडे नवीन जरा जुने