पाणी पिल्याने शरीरात नेमके शरीरात काय बदल होतात
शारीरिक तंत्राची कार्यक्षमता कायम राखण्यात पाण्याची भूमिका महत्त्वाची असते. पाण्याअभावी शरीराच्या अंतर्गत अवयवांची कार्यप्रणाली बाधित व्हायला लागते. त्यामुळे अधिकाधिक पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.दिवसभर भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी अनेक अर्थांनी गरजेचे आहे. कारण यावरच तुमची कार्यप्रणाली अवलंबून असते.


ब्रेन पॉवर बूस्ट

मानवी मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी पाण्याची सर्वाधिक गरज असते. पाण्यामुळे कॉग्निटिव्ह परफॉर्मन्स 30 टक्क्यांपर्यंत वाढतो. तज्ज्ञांच्या मते पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट पाहू नये. थोडे-थोडे पाणी पीत राहणे आवश्यक आहे.


मेटाबॉलिझम बूस्ट

जे लोक वजन कमी करण्यासाठी पर्शिम घेत आहेत, त्यांनी भरपूर पाण्याचे सेवन केले पाहिजे. र्जनल ऑफ क्लिनिकल अँडोक्रायनोलॉजी अँड मेटाबॉलिझमच्या संशोधनानुसार 17 औंस (0.502 लिटर) पाणी प्याल्याने मेटाबॉलिक रेट 30 टक्क्यांपर्यंत वेगवान होऊ शकतो.

सावधगिरी बाळगावी

कामाच्या व्यापामुळे अनेक लोक पाणी प्यायला विसरतात. त्यामुळे त्यांची ऊर्जा पातळी खालावते. परफॉर्मन्स चांगला राखण्यासाठी आणि फोकस वाढवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे.

डोकेदुखी राहणार नाही

र्जनल न्यूरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी मायग्रेनने पीडित असलेल्या लोकांवर संशोधन केले. या लोकांना दोन गटात विभागण्यात आले होते. एका गटाला प्लेसबो (एक औषध) घेण्यास आणि दुसर्‍या गटाला दीड लिटर पाणी पिण्यास सांगण्यात आले. दोन आठवड्यांनंतर अध्ययन केल्यावर पाणी पिणार्‍या गटातील लोकांना दुसर्‍या गटाच्या तुलनेत कमी त्रास झाल्याचे आढळून आले होते.

डिहायड्रेशन होत नाही
पुरेसे पाणी न प्याल्याने डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता भासते. यामुळे अन्न पचत नाही, थकवा येतो आणि डोके दुखायला लागते. अशा वेळी किडनीची कार्यप्रणालीदेखील बाधित होते.


थोडे नवीन जरा जुने