या पद्धतीने पाणी पिल्यास ते शरीरासाठी ठरू शकते घातक
पाण्याशिवाय जगण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. असे म्हणतात की, शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरातून कमीतकमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

पाणी पिल्याने फायदा तर होतोच, परंतु तेव्हाच जेव्हा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पिले तर. जर पाणी चुकीच्या पद्धतीने पिले किंवा चुकीच्या वेळी जास्त प्रमाणात पिल्यास ते शरीरासाठी अपायकारक ठरू शकते असे आयुर्वेदामध्ये वर्णीत आहे.

आयुर्वेदाला जीवनाचे विज्ञान मानले गेले जाते. आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग संग्रह (वाग्भट्ट) मध्ये सांगण्यात आलेल्या काही नियमांची माहिती देत आहोत.

पाणी पिण्याच्या नियमासंबंधीची विशेष माहिती डॉ. नवीन जोशी (एम.डी.आयुर्वेद) हे देत आहेत.

जाणून घ्या, पाणी किती, कसे आणि कोणत्या वेळेस प्यावे...

जेवण करण्यापूर्वी जर पाणी पिले तर हे पाणी अग्निमांद (पचनक्रिया मंद होणे) उत्पन्न करते. यामुळे अन्न व्यवस्थित पचन होण्यात बाधा निर्माण होते.

जेवणाच्या शेवटी पाणी पिल्यास शरीरात स्थूलता आणि आमाशयाच्या वरील भागामध्ये कफ वाढतो. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास जेवण झाल्यानंतर लगेच जास्त प्रमाणात पाणी पिल्यास लठ्ठपणा वाढतो आणि कफाचा त्रास सुरु होतो.


आयुर्वेदानुसार ताप आलेल्या व्यक्तीने तहान लागल्यानंतर जास्त प्रमाणात पाणी पिल्यास तंद्री, अंगामध्ये जडपणा, चक्कर येणे, श्वसनाचा त्रास उत्पन्न होण्याची शक्यता असते.

आमदोषामुळे अजीर्ण, गॅस होणे अशा समस्या निर्माण झाल्यास तहान लागली नसेल तरी कोमट पाणी पीत राहावे.


जेवणाच्या मध्ये थोडे-थोडे पाणी प्यायल्यास प्रकृती समस्थितीत राहते. आयुर्वेदानुसार जेवणाच्या मध्ये पाणी पिल्यास शरीरातील धातूंमध्ये समता उत्पन्न होते आणि अन्न व्यवस्थित पचते.

तहान लागल्यानंतर एकदम जास्त प्रमाणात पाणी पिणे शरीरासाठी खूप नुकसानदायक आहे. तहान लागल्यानंतर जास्त प्रमाणात पाणी पिल्यास पित्त आणि कफ दोषाशी संबधित आजार होण्याची शक्यता वाढते.


पाणी तेवढेच प्यावे जे अन्नाचे पचन करण्यात समर्थ असेल, अशा स्थितीमध्ये जास्त पाणी पिल्यास पचनक्रिया मंद होऊ शकते. यामुळे जेवणाच्या प्रमाणानुसार पाणी पिणे शरीरासाठी योग्य राहते.

कफ आणि वायुमुळे जे अन्न पचत नाही त्याला शरीर बाहेर टाकते. कोमट पाणी अशा अन्नाला सहजरीत्या पचवू शकते.


थोडे नवीन जरा जुने