हे पदार्थ खाताय ? ते तुमच्या शरीराला हानिकारक ठरू शकतात म्हणून तुमच्यासाठी या टिप्सआपण रोजच्या जेवणात ब-याच पदार्थांचे सेवन करीत असतो. त्यातून आपल्याला कोणते पोषकतत्त मिळतात आणि कोणते पदार्थ शरीराला हानिकारक असतात, याची आपल्याला नेमकी माहिती नसते. कोणत्या पदार्थातून कोणते पोषकत्त्वे मिळतात याची माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध असली तरी हानिकारक बाबी सहजासहजी आपल्यापर्यंत येत नाहीत.

त्यामुळे आज आम्ही अशा दहा पदार्थांची माहिती सांगणार आहोत, ज्यातून तुमच्या शरीराला काय मिळते याची कल्पना येईल. जर तुम्हाला सांगितले, की सेपच्या बिया विषारी असतात तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे शंभर टक्के खरे आहे... सेप खाल्ल्याने प्रकृती ठणठणीत राहते. डॉक्टरकडे वारंवार जावे लागत नाही. पण त्याच्या बिया फार विषारी असतात... या शिवाय काही पदार्थ एवढे भन्नाट आहेत, की त्यातून तुमचे मनोरंजनही होईल.

वजन कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की, केळी खाण्यापेक्षा त्याचा नुसता वास घेवून वजन कमी करा. तर तुमचा विश्वास बसणार नाही. होय, स्मेल आणि उपचार रिसर्च फाउंडेशन यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या एका अभ्यासादरम्यान हे स्पष्ट झाले आहे की, जर एखाद्या माणसाने केळीचा वास घेतल्यास त्याचे वजन कमी होण्यास मदत होते.
केळीचा वास घेतल्याने त्यामध्ये असणारा नैसर्गिक गोडपणा हा भुकेवर अंकुश मिळवण्यास मदतगार ठरतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही केळीचा वास घेवून वजन कमी करू शकता. तसेच तुम्ही हिरवे सफरचंद,व्हॅनिला अथवा पेपरमिंट याचा वास घेवून देखील वजन कमी करू शकता.


डिनर हा शब्द मुळात जुन्या काळातील डिसनर या फ्रेंच शब्दापासून घेण्यात आला आहे. सध्या हा शब्द आपल्यापैकी सगळेच जण रात्रीच्या जेवणासाठी वापरतात. पण अठराव्या शतकात दुपारच्या म्हणजे साधारण दुपारचे 2 ते 3 यामध्ये घेण्यात येणारे जेवण हे संध्याकाळचे जेवण म्हणून घेण्याची पद्धत होती.


भारतामध्ये गोल टरबूज आपण सर्वांनी पाहिले आहेत. पण जपानमध्ये चौकोनी टरबूज बघण्यास मिळतात. जेव्हा हे टरबूज तयार होत असतात त्यावेळी त्यांना एका चौकोनी आकाराच्या बॉक्समध्ये ठेवण्यात येते. जशी-जशी टरबूजाची वाढ होत जाईल ते त्या बॉक्सच्या आकाराचे तयार होऊ लागते.


कांदा,बटाटा आणि सफरचंद यांची चव सारखीच असते -

एखादे फुल वेगळे आहे हे त्याच्या वासावरून ओळखले जाते. पण कांदा, बटाटा आणि सफरचंद यांची चवही एक सारखीच असते असे सांगितले तर विश्वास बसणार नाही... पण हे सत्य आहे. तुम्ही नाक बंद करून या तिन्हीची चव घ्या ती तुम्हाला एक सारखीच लागेल.


मध कितीही जुने असले तरी चांगलेच राहते. 100 वर्षापुर्वीचे मधही तुम्ही खाऊ शकता. मध सांडल्यावर कधीच पसरत नाही. शास्त्रज्ञांना इजिप्शियन टोम्समध्ये मोठ्या प्रमाणात मध सापडले आहे. त्यात असणारे ऍसिडिक नेचर, हायड्रोजन द्रव आणि पाणी यामुळे कितीही वर्ष चांगले राहू शकते.


तुम्ही जर डाव्य हाताने जेवण केले तर नेहमीच्या जेवणापेक्षा तुम्हाला जेवण कमी जाईल. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका अभ्यासानुसार हा निर्कष काढण्यात आला आहे.


जुन्या पेपरचा वास हा व्हॉनिला सारखा येत असतो-
कागद बनवण्यासाठी झाडातील लिगनिनचा वापर केला जातो. वातावरणापासून कागद वेगळा ठेवल्यास त्यातील लिगनिन एकमेकापासून तुटतात. हे लिगनिन तुटल्यानंतर त्याचे रूपातर व्हॉनिलिनमध्ये होते. त्यामुळे जुन्या पेपरचा वास हा व्हॉनिला फ्लेव्हर सारखा गोड येतो.


सफरचंदातील बिया विषारी असतात -
सफरचंदाच्या बिया जर जास्त प्रमाणात पोटात गेल्या तर विषबाधा होण्याची शक्यता असते. यामध्ये असणा-या amygdalin या कम्पाउंडमुळे त्या विषारी असतात. त्यामुळे सफरचंदातील बिया जास्त खाल्यास पोटात त्रास होऊ शकतो.
एका पारंपरिक येमीनी लग्न सोहळ्यात संपुर्ण उंट ठेवण्यात आला होता. या वेळी उपथित लोकांना हे जेवण देण्यात आले. ही स्पेशल डिश अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आली होती. यासाठी उंटाला मेंढीने, मेंढीला चिकनने,चिकनला फिशने,फिशला अड्यांनी स्टफ करण्यात आले होते.


अस्वलाचे यकृत खाणे जीवघेणे ठरु शकते - काही ध्रुवांवरचे लोक अस्वलाचे यकृत खातात. पण असे यकृत खाणे हे जीवघेणे ठरू शकते. अस्वलाच्या यकृतामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन अ असते. जे सामान्य माणसाला पचवणे शक्य नसते. त्यामुळे अस्वलाचे यकृत खाणे टाळा.


थोडे नवीन जरा जुने