हे पदार्थ, खाल्ल्याने साखरेमुळे होणारे नुकसानही टाळता येते
 जास्त गोड पदार्थ खाणे शरीरासाठी हितकारक नसते. यामुळे आम्ही तुम्हाला अशा 20 पर्यायी पदार्थांची माहिती देत आहोत, जे खाल्ल्यामुळे गोड चव तर मिळतेच, पण साखरेमुळे होणारे नुकसानही टाळता येते.

1 - अँगेव्ह नेक्टर
अनेक वर्षांपासून ईश्वरी वरदान म्हणून याचा वापर केला जात आहे.याची चव मधाप्रमाणे असते.
गरम चहा किंवा आइस टीमध्येही वापर करता येतो. हेही कमी प्रमाणातच घ्यावे. फ्रक्टोसचे प्रमाण जास्त असल्याने अधिक घेतल्यास शरीरासाठी अपायकारक ठरू शकते.


2 - मेपल सिरप हे थेट रोपापासून मिळवले जाते. त्यात 50 अँटिऑक्सिडंट्स असतात. सुकामेवा, मध आणि खांडसरीबरोबरही वापर करता येऊ शकतो.


3 - मध मुळातच यात औषधी तत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. गरम पाणी, चहाबरोबर घेता येईल. सॅलेडवर टाकूनही खाता येऊ शकते. लिंबू-मध घेतल्याने पचनक्रिया चांगली राहते.

4 - अँपल सॉस ओटमिलच्या कुकीज बनवणार असाल तर एक वाटी साखर टाकण्याऐवजी अँपल सॉसचा वापर करावा. हे नैसर्गिक स्वीटनर आहे. ते घरीही तयार करता येऊ शकते.


5 - दालचिनी सकाळचा चहा किंवा कॉफीमध्ये दालचिनीचा वापर करावा. त्यामुळे एक वेगळी चव मिळेल. रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. कॅलरीज मात्र वाढणार नाहीत.


6 - द्राक्षाचा ज्यूस व्हिटॅमिन सीची दररोजची गरज पूर्ण करण्यासाठी हा साखरेला चांगला पर्याय ठरू शकतो. ते टॉनिकप्रमाणे काम करते. सोड्यावरोबरही हे घेता येईल.
7 - क्रॅनबेरी एक वाटी साखरेऐवजी याचा वापर केल्यास शरीरामध्ये अँटिऑक्सिडंट्सच्या प्रमाणामध्ये वाढ होते.


8 - मनुका कोणत्याही पदार्थासाठी एक वाटी मनुके साखरेला पर्याय म्हणून फूड प्रोसेसरमध्ये तयार करून वापरता येतात. यामुळे पदार्थाला एक वेगळी चवही मिळते. तसेच अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचे भरपूर प्रमाण असलेला आहारही मिळतो.


कोको पावडर

9 - उन्हाळ्यामध्ये गरम पाणी किंवा दुधामध्ये कोको पावडर टाका. साखरेची कमतरता पूर्ण करण्याबरोबरच यामुळे ताजेपणाही मिळतो. यात व्हॅनिला एक्सट्रॅक्ट्स टाकल्याने एक चांगली चवही मिळते.

10 - फ्रोजन ज्यूस कॉन्स्ट्रेट यात अँपल ज्यूसचा वापर करता येऊ शकतो. यात अतिरिक्त फायबर आणि अँटिऑक्सिडंटही असते. कोणत्याही चांगल्या मिठाईमध्ये वापर केल्यास साखरेची गरज पडणार नाही.


11 - बार्ली मार्ट अँक्स्ट्रेक्ट (सातूचे सत्त्व) सातूपासून तयार होते. भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. गडद रंग असणारे हे सायरप शिर्‍याप्रमाणे असते. कोणत्याही पदार्थाला एक वेगळी चव मिळते.

12 - शुकेनट साखरेला नैसर्गिक रूपात सादर करणारा ऊस असतो. सेंद्रिय उसापासून हे तयार केले जाते. साखरेची गरज पडत नाही.


13 - मोसंबी मोसंबीमध्ये अनेक औषधी तत्त्वे असतात. अधिक गोड असेल तर साखरेला योग्य पर्याय समजला जातो.
14 - कोकोनट शुगर नारळाच्या फुलामध्ये नैसर्गिक पद्धतीने ही साखर तयार होत असते. ही साखर बाजारात क्युब, पेस्ट आणि दाणेदार स्वरूपात मिळते. यात मोठय़ा प्रमाणात पोटॅशियम असल्याने हाडे मजबूत होतात.

15 - ब्राऊन राइस सिरप हे ब्राऊन राइसपासून मिळते. इतर हाय प्रोक्ट्स असणार्‍या आहाराच्या तुलनेत हे अधिक पौष्टिक असते. बेक्ड ब्रेडमध्ये याचा वापर केला जातो.
16 - स्टॅव्हिया (मधुपत्र) या झाडाची पाने साखरेपेक्षाही अधिक गोड असतात. ओटमिलच्या एका बाऊलमध्ये केवळ दोन थेंब रस टाकला तरी गोड चव मिळते.

17 - अँरिथ्रोटॉल हे शुगर अल्कोहोल असते. यामुळे दातही खराब होत नाहीत. पण हे साखरेएवढे गोडही नसते. ब्राऊनीजसारख्या चॉकलेट बेक्ड पदार्थांमध्ये वापर करता येतो.

18 - पेंडखजूर यात मोठय़ा प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. तसेच ग्लायसेमिकचे प्रमाण कमी असते.


19 - केळीचे पदार्थ हे खाल्ल्यास साखरेची गरज भासत नाही.

20 - अँप्रिकॉटची प्युरी व्हिटॅमिन ए आणि सीबरोबरच फायबर आणि आयर्न असणारे अत्यंत पोषक फळ आहे. योगर्टबरोबरही वापरता येते.थोडे नवीन जरा जुने