महिनाभरातच वजन वाढवण्याच्या खास टिप्स... हे 5 पदार्थ आहारात असावेच
अनेकवेळा तुम्ही वजन कमी करण्याच्या टिप्स संदर्भात ऐकले असेल परंतु काही लोक वजन वाढत नसल्यामुळे त्रस्त आहेत. येथे जाणून घ्या, कोणत्या गोष्टींमुळे वजन वाढू शकते.

वजन वाढवण्याच्या खास टिप्स...

कमी वजन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीमध्ये वजन वाढवण्यासाठी वर्कआउट आणि उत्तम डायट आवश्यक आहे.


वजन वाढवण्यासाठी केळी उत्तम पर्याय आहे. दररोज कमीत कमी तीन केळं खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होईल. दुध-दह्यासोबत केळी खाल्यास लवकर फरक दिसून येईल. केळाचे शेकही करून घेऊ शकता.


नाश्त्यामध्ये किंवा झोपण्यापूर्वी गरम दुधात मध टाकून घेतल्यास वजन लवकर वाढू शकते.

दररोज 30 ग्रॅम मनुका खाल्ल्यास एक महिन्यात वजन वाढेल.


बॉडी बिल्डर्स आणि पैलवान वजन वाढवण्यासाठी सुकामेवा घातलेल्या दुधाचे सेवन करतात. सुकामेवामध्ये तुम्ही बदाम, खारीक, अंजीर, मनुका उपयोगात आणू शकता.


आहारात जास्त कार्बोहायड्रेट आणि कॅलरी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. तांदूळ, मध, सुकामेवा, लोणी, तूप खाल्ल्याने वजन लवकर वाढते.थोडे नवीन जरा जुने