गरोदरपणात व्यायाम करणे आरोग्य आणि मुलासाठी फायदेशीर
संशोधनाअंती व्यायामामुळे लेबर आणि डिलिव्हरीची वेळ कमी होते. व्यायामामुळे उच्च् रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच प्रसव वेदनांसाठी महिला सज्ज राहते आणि हार्मोन्सही नियंत्रणात राहतात. तथापि, व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा.
गरोदरपणात व्यायाम करणे आरोग्य आणि मुलासाठी चांगले नाही, असे बहुतांश गरोदर महिलांना वाटते. मात्र, डॉक्टरांच्या मते, गरोदरपणात व्यायाम करणे आई आणि होणार्‍या बाळासाठी फायदेशीर ठरते.


शरीर आणि मेंदू बळकट होतात
गरोदरपणात व्यायाम केल्याने मेंदू आणि शरीर प्रसव वेदनांसाठी तयार होते. संशोधनाअंती व्यायामामुळे लेबर आणि डिलिव्हरीची वेळ कमी होते. व्यायामामुळे डिलिव्हरीही लवकर होते.


बाळाच्या मेंदूची क्षमता वाढते
2013 मध्ये मॉन्ट्रीयाल विद्यापीठाच्या संशोधकांनी आपल्या संशोधनातून हा दावा केला होता. या संशोधनाच्या आधारे त्यांचे म्हणणे होते की, गरोदरपणात 20 मिनिटांचा व्यायाम आठवड्यातून तीन वेळा केल्याने बाळाच्या मेंदूची क्षमता वाढते.
पाठीच्या त्रासातून सुटका

गरोदरपणात पाठदुखीचा त्रास होणे सामान्य समस्या आहे. त्याचा सर्वच महिलांना सामना करावा लागतो. मात्र, व्यायाम केल्याने ही समस्या कमी होऊ शकते. फक्त व्यायाम करताना पाठीवर झोपू नये.


गाढ झोप येते

असे आढळून आले आहे की, गरोदरपणातील अखेरच्या तीन महिन्यांमध्ये झोप न येण्याची समस्या उद्भवते. व्यायाम केल्याने या समस्येतूनही सुटका करून घेता येते. फक्त आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य व्यायाम करावा.


परत मिळेल पूर्वीचा आकार
आई झाल्यानंतर बहुतांश महिलांना आपल्या शरीराचा पूर्वीसारखा आकार असावा, असे वाटते. डॉक्टरांच्या मते, जर महिलांनी गरदोरपणात आणि मूल जन्मल्यानंतरही नियमितपणे व्यायाम केला तर त्यांना वजन कमी करणे सोपे जाईल.


हार्मोन्स संतुलित राहतात
गरोदरपणात महिलेच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यामुळे तिचा मूड वारंवार बदलतो. तुम्ही नियमितपणे व्यायाम करत राहाल तर ही समस्याही दूर होऊ शकेल. व्यायामामुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि आत्मविश्वासही वाढतो.


थोडे नवीन जरा जुने