तरुण वयातच म्हातारे होण्याची भीती वाटते ? हे वाचा




मानवी जीवनाचे तीन भागांमध्ये विभाजन केले गेले आहे. लहानपण, तारुण्य, आणि म्हातारपण या सगळ्यांमध्ये तारुण्याला अधिक महत्व दिले गेले आहे.

प्रत्येक व्यक्तिची आपण सदैव तरुण दिसावं अशी भावना असते. यासाठी ऑपरेशन,औषधे यांचा वापर केला जातो. तरी देखील बर्‍याच लोकांना अकाली वृध्द्त्वाला सामोरे जाव लागत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपली बदलेली जीवनशैली, असंतुलीत जेवण.

आपले तारुण्य जपण्यासाठी आपण सतत श्रम करत राहिल्याने आपल्या शरीरात तेज निर्माण होण्यास मदत होते. योगा केल्याने देखील शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते आणि चेहर्‍यावर पडणार्‍या सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत होते.

आपल्या दिनक्रमात सुधारणा करुन शरीराला आराम मिळेल याची काळजी घेतली गेली पाहिजे. माणसाला सहा तासांची झोप अतिआवश्यक आहे. सात्विक आहार घेतल्याने आणि सोबतीला योगासन केल्याने आपले तारुण्य जास्ती काळ टिकण्यास मदत होईल.


थोडे नवीन जरा जुने