अद्रकाचे 'हे' चमत्कारी फायदे, तुम्हाला ही आश्चर्य वाटेल
अद्रक सर्वांनाच माहिती आहे. मात्र सामान्य दिसणार्‍या या अद्रकाचे अनेक फायदे आहेत. अद्रकाला औषधी वनस्पतीही मानले जाते.

एका ताज्या अद्रकामध्ये 81% पाणी, 2.5% प्रोटीन, 1% वसा, 2.5% रेशा आणि 13% कार्बोहायड्रेट असते. अशा या बहूगूणकारी अद्रकामधून आयर्न, कॅल्शियम, आयोडिन, क्लोरिन आणि विटामिन सारखे अनेक पोषकद्रव्य असतात. अद्रकाला ताजे आणि कोरडे दोन्ही प्रकारांमध्ये वापरतात. अदरक एक चांगले रोगप्रतिकारकाचेही काम करते.

त्वचेसाठी उपायकारक
नियमित अद्रक खाल्याने त्वचा आकर्षक दिसते आणि चमकदार बनते. सकाळी सकाळी अनसपोटी एक ग्लास कोमट पाण्यासोबत अद्रकाचा तुकडा खाल्याने तुमची त्वचा चमकदार दिसेल.

खोकल्यासाठी औषधी

खोकल्यावर एक जालीम उपाय म्हणून अद्रकाचा उपयोग केला जातो. खोकल्या लागल्यावर अद्रकाचे छोटछोटे तुकडे करून एकसारख्या प्रमाणात मधासोबत गरम करून दिवसातून दोन-तीन वेळा खावे. यामुळे खोकला येणे बंद होईल तसेच गळ्यातील खरखरसुध्दा कमी होईल.

भूक वाढवण्यासाठी
जर तुम्हाला भूकच लागत नसेल तर अद्रकाच्या नियमित सेवनाने तुमची भूक वाढेल. अद्रकाला बारीक कापून, त्यावर थोडे मिठ टाकून सतत आठदिवस खावे. यामुळए पोट साफ होईल आणि ज्यास्त भूकही लागेल.


एसिडीटीच्या त्रासावर उपाय
एसिडीटी, बद्धकोष्ठ या आजारांवरही अद्रक एक चांगला उपाय आहे. अद्रकाला अजवाये आणि लिंबूचे सर यात एकत्रकरून त्यात थोडे मिठ टाकून खावे. यामुळे पोटाचे आजार कमी होतात. तसेच आंबड ढेकार येणेही बंद होती.

उल्टीच्या समस्येवर उपाय
जर वारंवार उल्ट्या येण्याची समस्या असेल तर अद्रकाला कांद्याच्या रसासोबत दोन चमचे प्यावे. यामुळे उल्टी होणे थांबते.


सर्दी-तापावरील उपाय
सद्री आणि तापावर अद्रक एक जालीम उपाय आहे. सर्दी झाल्यावर अद्रकाची चहा पीणे फायदेशीर असते. याशिवाय अद्रकाच्या रसाला मधामध्ये मिसळून गरम करून प्यावे.


तोंडाची दुर्गंधी
अद्रकाचा रस कोमट पाण्यात 1 चमचा टाकून प्यावे. तोंडातील दुर्गंधी ताबडतोब जाते.

उचकी
ताज्या अद्रकाची फोड तोंडात ठेवून चोखल्याने उचकी लगेच थांबते.
कर्करोगावरील उपाय
अद्रकामध्ये कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते. रक्ताच्या गाठी बनण्यापासून वाचणे, अँन्टी फंगल आणि कर्करोगांच्या प्रतिकारासाठी अद्रक वापरतात.

सांधेदुखीवर उपाय -
अद्रकाला बारीक वाटून त्याचे लेप सांध्यावर लावाले. 250 ग्रॅम तिळाच्या तेलात 500 ग्रॅम अदरक बारीक करून जोपर्यंत फक्त तेल उरत नाही तोपर्यंत उकळावे. त्यानंतर ते तेल थंड करून बाटलीत ठेवावे. दररोज दुखणार्‍या सांध्यावर त्याची मालिश करावी.
लकवा हात पाय सुन्न होणे -
उडदाची दाळ आणि अदरक बारीक करून त्याला तुपात मिक्स करावे. यामध्ये गुळ आणि सुंठही टाकावे. त्याचे लाडू बनवून ठेवावे. दररोज एक या प्रमाणे त्याचे सेवन करावे.

कानाचे दुखणे
थंड हवा अथवा कानामध्ये मळ साचल्याने अथवा कानात फोड झाल्याने कान दुखत असल्यास अद्रकाचे रस कापडाने गाळून घ्यावे आणि दोन तीन थेंब कानात टाकावे. असे तीन-चार वेळेस करावे.

इतर आजारांवरील उपाय
अद्रकाला औषधी म्हणूनही वापरतात. अद्रकाचे सेवन केल्याने शरीरात गाठी, अर्तराईटीस, सायटीका, गळा, आणि मणक्याच्या हाडांचे आजार कमी होतात. अद्रक महिलांना मासिक पाळीच्या अनियमिततेच्या समस्येपासूनही सुटका देते.

अद्रक खाल्ल्याने तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया कमी होतात.
अद्रक शरीरातील कोलेस्ट्रॉललाही नियंत्रणात ठेवते. यामुळे रक्तप्रवाह सुरूळीत राहतो.

अद्रकाच्या नियमित सेवनाने शरीरात रक्ताच्या गाठी बनत नाही.
अद्रकाचे रस आणि पाणी एकत्र पिल्याने हृदयासंबंधीचे आजार होत नाहीत.
अद्रक हे अत्यंत गरम असते. त्यामुळे गरमीमध्ये अद्रकाचे सेवक करू नये. खुपच आवश्यकता भासली तर थोड्या प्रमाणात अद्रक खावे.


थोडे नवीन जरा जुने