दररोज शरीरासाठी 1 तास द्या आणि आयुष्यभर निरोही रहा

कोट्यवधी लोक रोज रात्री झोपतात. मात्र, त्यांपैकी सगळेच दुस-या दिवशीची सकाळ पाहायला या जगात राहत नाहीत. तुम्ही भाग्यवान आहात.

तुम्हाला आणखी एक दिवस मिळाला. या एका दिवसासाठी ईश्वराचे आभार माना. हा दिवस संस्मरणीय होईल यासाठी संकल्प करा, त्या दिवसाचे सार्थक होईल, अशा पद्धतीने तो जगा. 

एक जुनी म्हण आहे- ‘लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य भेटे’. ते खरेही आहे. सूर्य ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे.

सूर्यादय झाल्यानंतर तुम्ही जितके उशिरा उठाल तितके जास्त सुस्त व्हाल. कोणतेही काम तुम्ही उत्साहाने करू शकणार नाही. कामातील चपळाई हरवेल. सूर्यादयानंतर जितक्या लवकर झोपेतून जागे व्हाल तितके तुम्ही ऊर्जावान, उत्साही आणि गतिमान झाल्याची तुम्हाला स्वत:लाच अनुभूती येईल.

सूर्यादयापूर्वी उठलात तर अधिक उत्तम. पशू, पक्षी आणि घरातील ज्येष्ठांकडे पाहा. ते किती उत्साही आणि ऊर्जेने भरलेले असतात. कारण ते सगळे सूर्योदयाच्या आगे-मागेच उठलेले असतात. पहाटेच्या वेळी बाहेर प्रदूषणमुक्त ताजी हवा असते. व्यायाम करण्यासाठी ही वेळ अतिशय चांगली असते.

दुसऱ्याच्या किडनीने नशीब पालटू शकते, मग निरोगी किडनीची गरजच काय? लाखो रुपयांत ओपन हार्ट सर्जरी करता येते, मग काय करायचे निरोगी हृदय? काही हजारांत मिळणारी बाइक आणि काही लाख रुपयांत मिळणा-या कारची किंमत आपल्याला चांगलीच कळते; मग ईश्वराने दिलेल्या शरीररूपी अमूल्य वरदानाचे मूल्य आपल्या लक्षात कसे येत नाही?

व्यायाम करावा की करू नये, असा काही पर्यायच नाही. तो करायलाच हवा. वजन कमी करण्यासाठी नाही, तर निरोगी राहण्यासाठी. शरीर तुमची काळजी घेण्यासाठी बनवलंय, तुम्हीही शरीराची काळजी घ्या. शरीर म्हणजे ईश्वराने तुम्हाला दिलेली भेट आहे.


त्याची काळजी घेणं ही तुमची जबाबदारीही आहे. आयुष्यभर तुमचं शरीर म्हणजे तुमचा पत्ता असतं. एक तास व्यायामासाठी शरीराला द्या. बाकीचे 23 तास शरीर तुमची देखभाल करील.

थोडे नवीन जरा जुने