घरातील तणावामुळे रक्तदाबाची समस्या वाढली आहे ? घाबरू नका...ही ४ योगासने रोज करा आणि फरक पहा !
घरातील किंवा बाहेरील तणावामुळे महिलांमध्ये रक्तदाबाची समस्या वेगाने वाढत आहे. यापासून बचाव करण्यासाठी काही योगासने आहेत. ती तज्ज्ञांचा सल्ला घेऊन केल्यास फायदा मिळेल.

पश्चिमोत्तासन


समोरच्या दिशेने पाय पसरवून बसा. श्वास घ्या आणि हात थेट पुढच्या दिशेने झुकवा. हळूहळू पुढच्या दिशेने झुका आणि हात स्ट्रेच होऊ द्या. हातांनी पायाच्या अंगठय़ाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. 15-30 सेकंद असेच राहिल्यानंतर श्वास सोडत जुन्या अवस्थेत या.

भुजंगासन
जमिनीवर पालथे झोपा. श्वास घेत हळूहळू डोके वर उचला. स्ट्रेचिंग करताना डोके मागच्या बाजूने आणि दोन्ही हात पुढे जमिनीवर टेकवून ठेवा. 15-30 सेकंदांपर्यंत असेच राहा. श्वास सोडत पुन्हा जुन्या अवस्थेत या.


बिदालासन
छायाचित्रात दाखवल्यानुसार जमिनीवर या पोझिशनमध्ये या. हात आणि गुडघे हे खांदे व हिप्सच्या आतल्या दिशेने ठेवा. या अवस्थेत हात उघडे असावेत आणि नजर फ्लोअरकडे ठेवावी. श्वास सोडत कंबर उचला आणि डोके झुकवा. श्वास घ्या आणि पुन्हा जुन्या अवस्थेत या.


अर्ध मत्स्येंद्रासन
पाय समोरच्या बाजूने पसरवून बसा. मणका ताठ ठेवा आणि दोन्ही पाय एकमेकांना चिकटवा. डावा पाय वाकवून टाच उजवीकडे हिप्सजवळ घेऊन जा. डावा हात, मान सर्व या दिशेने वाकवा आणि शरीर स्ट्रेच होऊ द्या. श्वास सोडत जुन्या अवस्थेत या.


थोडे नवीन जरा जुने