ऑफिस मध्ये काम करताना तुम्ही चुकीच्या सवयींना बळी पडलात ?
नोकरी करणाऱ्यांसाठी कार्यालय त्यांचे दुसरे घरच असते. मात्र, काही लोक या ठिकाणी चुकीच्या सवयींना बळी पडतात. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. तुम्हाला या सवयी आहेत का?
नाष्टा न करणे :

न्याहारी हा दिवसातला सर्वात महत्त्वाचा आहार असतो. अनेकदा घाईत घरातून निघाल्याने आपण कार्यालयात नाष्टा करू, असे ठरवतो. मात्र, कामाच्या रगाड्यात जमत नाही. असे सतत होत राहिले तर आरोग्य बिघडते. न्याहारी व्यवस्थित झाली तर चयापचय क्रिया निरोगी राहते. शरीरात ऊर्जा शक्ती निर्माण होते.

पायांना अढी घालून बसणे :
आरामवाटावा म्हणून लोक पायांना अढी घालून बसतात. मात्र, अधिक काळ असे बसल्यास कंबर वा मानेचे दुखणे संभवते. रक्तदाबही वाढतो.

खुर्चीत वाकून बसणे :
डेस्क जॉब असेल तर 9 ते 5 किंवा 10 ते 7 खुर्चीत बसावे लागते. त्या वेळी शरीराची स्थिती योग्य असावी. कंबर, मानदुखी संभवते. त्यामुळे खुर्चीत ताठ बसावे. गरज भासल्यास छोटी कुशन पाठीसाठी वापरा.
स्वच्छतागृहात फोन घेऊन जाणे :
तुम्हीदेखीलअसे करत असणार. मित्रांशी वा ग्राहकांशी फोनवर बोलत स्वच्छतागृहात जाण्याची सवय असल्यास ते टाळा. तेथील किटाणू डेस्कवर येतात.
डोळ्यांना सतत हात लावणे :
काम करताना डोळे चेहऱ्याला सारखे हात लावणे टाळा. त्यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो. डोळ्यांना चोळल्यास त्या बाजूची त्वचा संवेदनशील असल्याने नुकसान होते.


तासचे तास एकाच ठिकाणी बसून राहणे :
डेस्क जॉब असणारे तासन््तास खुर्चीवर खिळून असतात. त्यांच्याकडे पर्याय नसतो. मात्र, अधूनमधून उठून फेरफटका मारा. दर तासाला एक चक्कर मारा. स्वत: उठून चहा-पाणी घेऊन या.


पाणी कमी पिणे :
डेस्कवरकाम करताना चहा कॉफी पीत राहणे. पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करणे ही घातक सवय आहे. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होते. आरोग्याच्या तक्रारी वाढतात.


थोडे नवीन जरा जुने