मधाचे हे आहेत तब्बल 15 आश्चर्यचकित करणारे फायदे
मधाला आयुर्वेदात खुप गुणाकारी मानले जाते. मध हे फ्रक्टोज, ग्लूकोज, सुक्रोज, माल्टोज आणि शर्कराचे मिश्रण आहे. यामध्ये 75 टक्के साखर असते.

याव्यतिरिक्त मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, चरबी, एंजाइम अमीनो एसिड, कार्बोहायड्रेट्स, आयोडीन आणि लोह, तांबे, मॅगनीज, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फोरस, कॅल्शियम, क्लोरिन सारखे मानवी आरोग्यासाठी उपायकारक खनिज उपलब्ध असतात.

यासोबतच यामध्ये बहूमूल्य व्हिटॅमिन, रायबोफ्लेवन, व्हिटॅमिन ए, बी-1, बी-2, बी-3, बी-5, बी-12 तसेच सी, व्हिटॅमिन एच देखील उपलब्ध असते. तसे तर तुम्ही मधाविषयी खुप ऐकले असेल परंतु आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत मधाचे काही असे उपयोग ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

1. एक चमचा मधामध्ये एक चर्तुर्थांश चमचा पाणी टाका. हे मिश्रण शाम्पू करण्याअगोदर काही वेळा अगोदर केसांमध्ये लावा. यानंतर केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या. केस खुप सिल्की आणि शायनी होऊ लागतील.

2. मध, व्हिनेगर आणि पाणी तिन्हीही समान प्रमाणात एकत्र करा. याचा वापर झाडांवर करा. हे एका नॅचरल कीटनाशका प्रामाणे काम करते.

3. जर तुम्हाला पार्टीमध्ये जायचे असेल आणि पिंपल्स आले तर त्यावर थोडे मध लावा. हे अर्धाच तास लावून ठेवा. असे केल्याने पिंपल्स कमी होतील.

4. जर कफची समस्या असेल तर एक चमचा मधामध्ये लिंबूचा रस किंवा थोडेसे कोकोनट ऑइल मिश्रित करुन घेतल्याने खुप फायदा होतो.


5. डायबिटीक लोकांना शुगर फ्रीच्या ऐवजी मधाचा उपोयग केला पाहिजे. कारण मध ब्लड शुगर लेवलला कमी करते.

6. जर तुम्ही नियमित 2 ते 4 पर्यंत जागे राहत असाल म्हणजेच झोप न येण्याची समस्या असेल तर एक चमचा मधामध्ये थोडे मीठ टाकून सेवन करा. खुप गाढ झोप लागेल.

7. एखादी जखम झाल्यावर किंवा इजा झाल्यावर त्या ठिकाणी अँटीबायोटिक क्रीमच्या जागी मधाचा उपयोग केला जाऊ शकते. कारण मध एका नॅचरल अँटीबायोटिक प्रमाणे काम करते. हे जखमेवर नियमित लावल्याने जखम लवकर चांगली होते.

8. जर तुम्हाला चटका लागला किंवा पोळले तर त्या ठिकाणी मध लावावे. जळलेल्याची खुन राहणार नाही.

9. वजन कमी करण्यासाठी देखील मध एक चांगला उपाय आहे. तुम्ही ज्या ठिकाणी साखरेचा उपयोग करतात त्या ठिकाणी मधाचा उपयोग करा. वाढणारे वजन खुप लवकर नियंत्रणाच येईल.

10. जर तुम्ही तुमच्या शरीराच्या पुर्ण त्वचेला एकदम स्वच्छ करु इच्छिता तर तीन चमचे मधामध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळून अंघोळीच्या पाण्यात टाका. हे तुमच्या स्किनला नॅचरली मॉश्चराइज करेल आणि तुमची स्किन ग्लो करायला लागेल.

11. जेव्हा तुम्ही तनावात असाल तेव्हा चहामध्ये एक थेंब मध टाकून प्या. रिलॅक्स फील कराल.

12. हँगओव्हर झाला असेल तर ब्रेकफास्टमध्ये मध लावलेला टोस्ट आणि चहामध्ये मध टाकून प्या. असे केल्याने शरीराचे मॅटाबॉलिज्म चांगले होते ज्यामुळे एल्कोहोलचा प्रभाव नष्ट होतो.

13. दोन थेंब मध हातावर घ्या आणि त्यामध्ये दोन थेंब कोमट पाणी टाका. हे दोन्ही हातांनी चेह-याला लावून चेह-यावर क्लॉकवाइज मसाज करा. काही काळ ते तसेच राहू द्या आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. या नॅचरल फेस वॉशला यूज करा. तुमचा चेहरा चमकदार होईल.

14. जेव्हा तुम्हाला अशक्तपणा वाटेल तेव्हा एक चमचा मध खा. काही काळातच तुम्हाला एनर्जी येईल.

15. बदाम तेल, बेस वॅक्स आणि मध हे तिन्हींचे मिश्रिण करुन तुम्ही लिप बाम तयार करु शकता.थोडे नवीन जरा जुने