केस गळती वर हा आहे रामबाण उपाय
अ‍ॅपल साइडर व्हिनेगर हे सफरचंदाच्‍या गरापासून तयार करण्‍यात येणारे औषध. व्हिनेगरयुक्‍त हे औषध विविध आजारांवर गुणकारी ठरते. या व्हिनेगर मुळे नेहमी- नेहमी डॉक्‍टरकडे जाण्‍याची गरज पडत नाही.
सफरचंदापासून तयार करण्‍यात आलेला 'अ‍ॅपल साइडर व्हिनेगर ' आरोग्‍यासाठी औषधाचे काम करतो. रोज याचे सेवन केले तर विविध आजारावर मात करता येते.

आज आम्‍ही तुम्‍हाला सफरचंदापासून तयार करण्‍यात आलेल्‍या 'अ‍ॅपल साइडर व्हिनेगर' विषयी माहिती देणार आहोत.

जेवण केल्‍यानंतर पचन होत नसेल तर मधासोबत थोडा व्हिनेगर घ्‍या यामुळे पचन क्रिया सुरळीत होते. अ‍ॅपल साइडर व्हिनेगर मध्‍ये पॅक्टिन जास्‍त प्रमाणात असल्‍यामुळे पॅक्टिन हा कफ, गॅस, अ‍ॅसिडिटी या सारख्‍या समस्‍यांपासून बचाव करतो.

वारंवार उचकी लागत असेल तर अ‍ॅपल साइडर व्हिनेगर मध्‍ये थोडे पाणी टाकून प्‍यायल्‍यानंतर उचकी येणे बंद होते.

साइनस सारख्‍या आजारावर साधा आणि सोपा उपाय व्हिनेगरच्‍या माध्‍यमातून करता येतो. पाण्‍यामध्‍ये व्हिनेगर मिसळून नाकात टाकल्‍यानंतर नाक मोकळे होते. श्वास घ्‍यायला त्रास होत नाही. ब-याच लोकांच्‍या शरीराच्‍या घामाचा वास येतो अशा लोकांसाठी व्हिनेगर महत्‍वाची भूमीका पार पाडतो.

जर तुमच्‍या शरीराचा घामाचा वास येत असेल तर व्हिनेगर आंघोळ करण्‍याच्‍या अगोदर शरीराला लावा. असे केल्‍यानंतर घामाचा वास येत नाही. काही लोंकाच्‍या तोडाचा वास येतो. असे लोकांनी अ‍ॅपल साइडर व्हिनेगर पाण्‍यात टाकून गुळण्‍या केल्‍यांनतर तोडांचा वास येणार नाही.

एक ग्‍लास पाण्‍यात थोडी आदरक टाका. मध आणि व्हिनेगर याचे मिश्रण तयार करा. या मिश्रणाच्‍या गुळण्‍या केल्‍यानंतर सर्दी राहते. सफरचंदामध्‍ये अँटीसेप्टिक घटक असतात. व्हिनेगर चे नियमीत सेवन केल्‍यानंतर व्‍हायरल इंफेक्‍शन होत नाही. डायबिटीजला कंट्रोलमध्‍ये ठेवण्‍याचे कमा व्हिनेगर करते. यामध्‍ये अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड असल्‍यामुळे व्हिनेगर चे सेवन केले तर वजन कमी होते.

जर तुम्‍हाला शरीराचे वजन कमी करायचे असेल तर रोज थेडा व्हिनेगर पाण्‍यात टाकून प्‍यायल्‍यानंतर वजन कमी होते. 'अ‍ॅपल साइडर व्हिनेगर ' मध्‍ये पोटॅशियम आणि कॅल्‍शीयम प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्‍येक दिवशी थेडे पाण्‍यासोबत घेतल्‍यानंतर शरीरातील हाडे मजबुत होतात.

मुलतानी मा‍तीसोबत मध आणि व्हिनेगर चे मिश्रण्‍ा तयार करून चेह-यावर लावा. 15 मिनीटानंतर चेहरा स्‍वच्‍छ धुऊन घ्‍या. चेहरा स्‍वच्‍छ करताना पाण्‍यात थोडे व्हिनेगर टाका. असे केल्‍यानंतर चेह-यावरील काळे डाग कमी होण्‍याबरोबरच चेह-याचा रंग उजळतो. चेह-यावर सुरकुत्‍या दिसत असतील तर रात्री झोपण्‍यापूर्वी 'अ‍ॅपल साइडर व्हिनेगर ' मध्‍ये थेडे पाणी टाकून चेह-याला लावा. सकाळी पाण्‍याने चेहरा स्‍वच्‍छ करा. असे केले तर चेह-यावरील सुरकुत्‍या कमी होतील.

इशारा- अ‍ॅपल साइडर व्हिनेगर नेहमी पाण्‍यात किंवा 'हर्बल टी' मध्‍ये मिसळून प्‍यायला हवे.थोडे नवीन जरा जुने