माणसाला किती तासांची झोप आवश्यक असते?
सध्याच्या ताणतणावाच्या परिस्थितीत लोक पुरेशी झोप घेऊ शकत नसल्याचे दिसून येते. त्याची कारणे वेगवेगळी असू शकतील; पण झोप घेण्याचा कालावधी कमी झाला आहे हे नक्की. त्यातच स्थूलपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. या सगळ्यांचा झोपेशी काही संबंध असावा का? उत्तम आरोग्यासाठी दररोज किती तासांची झोप आवश्यक असते?असे स्वाभाविक प्रश्न यातून निर्माण होतात.

ब्रिटनमध्ये मायकेल मोझले यांनी युनिव्हर्सिटी ऑफ सरेंज स्लीप रिसर्च सेंटरमध्ये झोपेवर एक संशोधन करून तपासले की एक तास झोप वाढवल्याने काय परिणाम दिसून येतो. या प्रयोगात त्यांनी 6 ते 9 तासांची झोप घेणार्‍या व्यक्तींना सहभागी करून घेतले. या चमूतील लोकांना एक आठवडा अनुक्रमे साडेसहा व साडेसात तासांची झोप घेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. दुसर्‍या आठवड्यात दोन्ही संघांना झोपेच्या कालावधीची अदलाबदल करण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या रक्ताचे पुन्हा परीक्षण केले.

500 गुणसूत्रे प्रभावित आढळली
या परीक्षणात आढळले की कमी झोपेचा थेट परिणाम आपल्या मानसिक कौशल्यावर होत असतो तसेच त्याचा परिणाम थेट आपल्या गुणसूत्रांवरही होतो. झोपेमुळे 500 गुणसूत्रे प्रभावित होतात,कमी झोप घेतली तर सतर्कता, प्रतिसाद, अंमलबजावणी, तणाव, मधुमेह आणि कर्करोग यांच्या जोखमीशी संबंधित गुणसूत्रे अधिक सक्रिय होतात, तर साडेसात तास झोप घेतल्याने याच्या अगदी विपरीत परिणाम दिसून येतो.
स्मरणशक्ती होऊ शकते नष्ट
स्लीप सेंटरच्या डॉ. कॅथरिना वुल्फ यांच्या म्हणण्यानुसार उत्तम आरोग्यासाठी गाढ झोप गरजेची आहे. या दरम्यान आपला मेंदू तात्पुरत्या स्मरणशक्तीचे दीर्घकाळाच्या स्मरणशक्तीत रूपांतर करीत असतो, त्यामुळे तात्पुरती स्मरणशक्ती दुसर्‍या दिवशी नव्या घटनांच्या नोंदींसाठी मोकळी राहते. जर गाढ झोप मिळाली नाही तर आमची स्मरणशक्ती हळूहळू नष्ट होऊ शकते. काही तासांच्या गाढ झोपेदरम्यान रॅपिड आय मूव्हमेंट (आर.ई.एम.) झोपही शरीर घेत असते त्यादरम्यान शरीर स्तब्ध असले तरी डोळ्यांची जोरदार हालचाल होत असते. या अवस्थेत मेंदूत तणावाशी संबंधित असलेले रसायन बनण्याची प्रक्रिया ठप्प झालेली असते. त्यावेळी आमचा मेंदू संपूर्ण दिवसातील घडामोडींवर पुनप्र्रक्रिया करीत असतो. अशा प्रकारची झोपेची अवस्था मध्यरात्रीनंतर येत असते. दारू पिणे या झोपेसाठी हानिकारक असते. त्यामुळे अशी आर.ई.एम.झोप कमी होत असते.


दररोज काही वेळ मौन ठेवणे आणि ध्यान करणे ही एक आध्यात्मिकदृष्ट्या चांगली साधना आहे. मौन धारण केल्यानंतर जे विचार निर्माण होतात, त्या विचारात लहानात लहान इच्छा देखील पूर्ण करण्याचे सार्मथ्य असते. मानसशास्त्रज्ञाच्या मते, प्रत्येक दिवशी 60 हजार विचार निर्माण होतात. त्यातील 90 ते 98 टक्के विचार दैनंदिनच असतात. अशाप्रकारे प्रत्येक विचार मेंदूत केमिकल रिलिज करतात. न्युरो शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार माणसाच्या मेंदूत 100 अरब न्युरॉन असतात. प्रत्येक न्युरॉनचे 1000 संपर्क शरीरात असतात. प्रत्येक संपर्क प्रतिसेकंदाला 200 वेळा आपला परिणाम दाखवितात. त्यामुळे 20 हजार करोड खरब कॅल्क्युलेशन प्रतिसेकंद सुरू राहतात. हे सर्व प्रकार जीवन ऊर्जेतून चालतात. त्यामुळे आपण जर आपल्या विचारांना कमी करायला शिकला तर जीवनासाठी ते खूप उत्तम राहील. काही मिनिटांसाठी मौन ठेवले तर शरीरातील ऊर्जेमध्ये वाढ होण्यास मदत होईल.


आपण विचारांचे प्रमाण कमी करण्यासाठी काम केले, तर विचारांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. जसजसे आपण विचारांना थांबवायला शिकू आणि त्यात यश येत जाईल तसतसे आपण कोणताही विचार आपल्यासोबत जास्त वेळ ठेवू शकतो. त्यामुळे तो विचार ताकदवान होईल; प्रत्येक विचार एक रचनात्मक शक्ती असते.

याचाच अर्थ असा देखील आहे की, जीवन आपल्याला चालवत नाही, नाहीतर आपण आपल्या पद्धतीने जीवनाला फिरवू शकतो. काही वेळ मौन धारण केल्यामुळे आपण आपल्या पद्धतीनुसार वातावरण निर्माण करू शकतो. मौनात जास्त फ्रिक्वेन्सी असलेले तरंग असल्यामुळे मौनातून काही विचार बाहेर पडले तर त्यातून चांगले परिणाम साधू शकतात. त्यामुळे मौनातून काहीही साध्य करता येऊ शकते.निद्रानाशाच्या गंभीर समस्येवरील घरगुती सोपे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...


तणावपूर्ण वातावरण, अपेक्षांचे ओझे, घरच्यांकडून उपेक्षा व धावपळीचे जग यामुळे आज एका नवीन समस्येला जगाला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे निद्रानाश (झोप न येणे). मग यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ येते. त्यातूनच पुढे डिप्रेशन येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या आजाराने आज ग्रस्त केले आहे.
तर या आजाराची साधारण कारणे व सहज घरी करण्याजोगे उपाय आपण बघूया....


कारणे -तणावपूर्ण वातावरणात जगणे, काम करणे. अपेक्षांचे अति ओझे असणे, त्यामुळे सतत विचार करणे.
उत्तेजक पदार्थांचे सेवन करणे- उदा. कॉफी, बिअर, सिगारेट, उत्तेजक दृश्य बघणे, विचार करणे.
आयुर्वेदानुसार मलबद्धता हेही एक मुख्य कारण आहे. उपाशी झोपणे, पोटाच्या आजाराच्या समस्या.
रात्री जास्त प्रमाणात पाणी पिणे, त्यामुळे लघवीसाठी वारंवार उठावे लागणे.
मनाला उत्तेजना देणारे कार्य करणे. उदा. रात्री झोपताना टीव्ही बघणे.
पिझ्झा, बर्गर, वडापाव, चायनीजसारखे कुपोषण करणारे पदार्थ खाणे.


उपायनियमित व्यायाम केल्याने शरीराचे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते व त्यामुळे झोप येते.


योगा, प्राणायाम व देवाची प्रार्थना केल्यास मन शांत होते व व्यवस्थित झोप येते.


रात्रीचे जेवण हलके घ्यावे व जास्त पाणी पिऊ नये. अति तिखट, मसालेदार, मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे.


रात्री झोपताना मनाला आवडेल असे संगीत ऐकावे. दीर्घ श्वसन केल्यास मनाचा अति चंचलपणा कमी होतो.


झोपण्याच्या बेडचा उपयोग केवळ झोपण्यासाठीच करावा. यावर लॅपटॉप बघणे, मोबाइल खेळणे इत्यादी उपद्व्याप करू नयेत. जेणेकरून शरीराला एक सवय पडेल की बेड केवळ झोपण्यासाठीच आहे. प्राणीदेखील झोपण्यासाठीच रोज एकाच जागेचा उपयोग करतात.झोपण्याच्या व जागण्याच्या वेळा निश्चित असाव्यात; जेणेकरून शरीराचे biolocal clock‘ सेट राहील.


चिंता दूर सारून प्रसन्न, आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.


नियमित मसाज केल्याने झोप व्यवस्थित येते. किमान झोपण्यापूर्वी चेह-या ची, डोक्याची तेलाने हळुवार मालिश केल्यास झोप येते.


वरील उपाययोजना करूनही निद्रानाश न गेल्यास आयुर्वेदिक पंचकर्मात सांगितलेली शिरोधारा करावी. याने औषधी न घेता कोणत्याही दुष्परिणामांविना मन व डोके शांत होऊन झोप येते. तणाव (depression) दूर होतो. ही अतिशय उपयुक्त प्रक्रिया आहे.
आयुर्वेदात काही औषधी योजनाही सांगितलेली आहे. जसे. अश्वगंधा, ब्राह्मी, सर्पगंधा, जटामांसी. या औषधीचे वैशिष्ट्य म्हणजे सवय लागत नाही. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वरील उपाय करून निद्रा - झोप घ्यावी. स्वस्थ, प्रसन्न जीवन जगावे. असे केल्याने आपला व परिवाराचा तणाव दूर होईल. शिरोधाराही घ्या. ही अमृततुल्य उपाययोजना आहे.


थोडे नवीन जरा जुने