आहारात मिठाचं प्रमाण किती असाव ?
हॅमबर्गर, फ्रेंच फ्राइज, चिप्स, पॉपकॉर्न, पिझ्झा इ . पदार्थ खायला मिळाले की, तुम्ही हेल्दी फूड ही गोष्टच विसरून जाता. पण, या पदार्थांमधून तुम्ही एकावेळी किती मोठ खाता, हे तुमच्या लक्षात येते का ?

तुमच्या शरीराला हवे असते त्याच्या दुप्पटतिप्पट मीठ तुम्ही एका दिवसात खात असता.

जास्त मीठामुळे पुढे मुलांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची भीती असते.

खरे तर मीठाचे रासायनिक नाव सोडियम क्लोराइड आहे.

यामधील दोन्ही खनिजे आपल्या शरीरासाठी आवश्यक तर आहेत , पण गरजेपेक्षा जास्त मीठ खाणे नुकसानदायकही आहे.

कोणतीही हिरवी पालेभाजी घ्या. त्यावर मीठ शिडका व थोडा वेळ ठेवा. काय झाले. ती कोमेजली ना? मीठ भाज्यांच्या पेशींमधून पाणी बाहेर खेचते. जर तुम्हीही जास्त मीठ खात असाल, तर तुमच्या शरीरातील पेशीही अशाच होतील.
पेशींभोवतालच्या द्रवात मीठाचे प्रमाण वाढले, तर त्यामुळे पेशींमधून जास्त पाणी व पोटॅशियम बाहेर पडते. अशा कोमेजलेल्या पेशी नीट काम करीत नाही व आपण आजारी पडतो.
थोडे नवीन जरा जुने