तुम्ही स्वतः निरोगी आहात की नाही असे ओळख




प्रत्येक व्यक्ती स्वतःला पूर्णपणे निरोगी आणि हेल्दी समजतो, जोपर्यंत अचानक त्याला एखादा आजार होत नाही. आजारी पडल्यानंतर त्याला जाणवते, की तो एका भ्रमामध्ये जगत होता. एक सामान्य मनुष्याला पाहून तो वास्तविकपणे निरोगी आहे की नाही हे समजून घेणे कठीण आहे.

काही लोक स्वतःला धडधाकट दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु वास्तविकतेमध्ये तसे नसते. निरोगी आरोग्याचे काही मापदंड आहेत. आज आम्ही तुम्हाला याच मापदंडाच्या संदर्भात माहिती देत आहोत.

तुम्ही या मापदंडावर किती खरे उतरता, त्या आधारावर तुम्ही स्वतःच्या आरोग्यासंबंधी अनुमान लावू शकता....

१ - निरोगी व्यक्तीला सकाळी आणि रात्री चांगली भूक लागते. वयानुसार तो आपला पूर्ण आहार ग्रहण करतो. जर असे नसेल तर सामून घ्या, की तुम्ही निरोगी नाहीत.

२ - शांत झोप उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. काही लोकना अंथरुणावर पडल्यानंतर लगेच गाढ झोप लागते, हा एक चांगला संकेत आहे. परंतु असे नसेल तर तुमच्या आरोग्यात काहीतरी गडबड आहे असे समजावे.

३ - रात्री झोपल्यानंतर निरोगी व्यक्ती सकाळी उठल्यानंतर उत्साह आणि स्फूर्तीचा अनुभव करतो. झोप झाल्यानंतरही एखाद्या व्यक्तीला थकवा जाणवत असेल तर त्याने उपचार घेण्याची आवश्यकता आहे.

४ - एका निरोगी व्यक्तीमध्ये थंडी आणि गरमी सहन करण्याची पर्याप्त क्षमता असते.



५ - स्वस्थ व्यक्तीला दररोज सकाळी कोणताही प्रयत्न न करता साफ शौच होते. ही पण चांगल्या आरोग्याची एक निशाणी आहे.


६ - शारीरिक श्रम केल्यानंतर निरोगी व्यक्तीला खूप जास्त प्रमाणात थकवा जाणवत नाही. सामान्य थकव्यानंतर त्यामध्ये पुन्हा उर्जा, उत्साह निर्माण होतो.

थोडे नवीन जरा जुने