अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर त्वरित आरामासाठी करून पाहा
अनियमित दिनचर्या आणि खान-पानामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. यामुळे पोटात गॅस किंवा वाताची समस्या सुरु होते आणि याच गॅस्ट्रिक ट्रबलमुळे शरीरात इतर आजार (ज्यांना आयुर्वेदामध्ये वात रोग असे म्हणतात) निर्माण होतात.


ज्या लोकांना ही समस्या असते त्यांना एसिड रिफ्लक्सचा त्रास सुरु होतो. तुम्हालाही वारंवार गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर येथे काही घरगुती सोपे उपाय सांगण्यात येत आहेत. या उपायांमुळे तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळेल.
लवंग -
हा एक असा मसाला आहे, जो गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या असणार्या लोकांसाठी एक रामबाण औषध आहे. लवंग चंगळल्याने किंवा लवंग मधासोबत खाल्ल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि गॅसची समस्या दूर होते.
जिरे -

जिरे खाल्ल्याने पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. तुम्हाला केव्हाही गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरु झाल्यानंतर एक चमचा जिरे पावडर थंड पाण्यातून घेतल्यास आराम मिळेल.
पुदिना -
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक, पाचक व वातानुलोमन करणारी आहे. पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते.
ताक -

थोडेसे मेथी दाणे, हळद, हिंग आणि जिरे बारीक करून चूर्ण तयार करा. सकाळी जेवण केल्यानंतर ताकामध्ये हे चूर्ण टाकून पिल्यास गॅस, एसिडिटीची समस्या दूर होईल.
हळद -
हळदीला सर्वात दमदार अँटीबायोटिक मानले जाते. त्वचा, पोट, आणि शरीरातील विविध आजारांवर हळद रामबाण उपाय आहे. थोडीशी हळद थंड पाण्यातून घ्या, त्यानंतर दही किंवा केळ खा.
काळे मिरे -
काळे मिरे पोटातील गॅस समस्या दूर करण्याचा प्रभावी उपाय आहे. अर्धा ग्रॅम काळे मिरे बारीक करून त्यामध्ये मध मिसळून, या मिश्रणाचे सेवन केल्यास आराम मिळेल.
तुळस -
विविध आजारांमध्ये तुळस उपयुक्त औषधीप्रमाणे काम करते. दररोज तुळशीचे पाच पानं खाल्ल्यास पोटातील गॅसची समस्या तसेच इतर पोटाचे आजार ठीक होतील. गॅस समस्येमध्ये तुळशीचा चहा करून पिल्यास आराम मिळेल.
पपई -

हे एक चवदार, गोड आणि आरोग्यदायी फळ आहे. पपईत बीटा-कॅरोटिन, ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, प्रोटीन आदी तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. पपई खाल्याने पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते.
अननस -
अननसात तंतुमय पदार्थ भरपूर असतो. यामध्ये पाचक एन्जाइम्स उपलब्ध असतात. पोटात गॅसची समस्या असल्यास एल्कलाइन तत्व असलेल्या पदार्थांचे भरपूर सेवन करावे. अननसामध्ये एल्कलाइनचे प्रमाण जास्त असते. यामुळे याचे सेवन केल्यास गॅसची समस्या दूर होते. परंतु नेहमी पिकलेले अननस खावे. अननसाच्या सेवनाने पचनास फायदा होतो.
बटाटा -
गॅसची समस्या दूर करण्यात बटाट्याचा उपाय तुम्हाला थोडासा विचित्र वाटेल परंतु, बटाट्याचा रस पिल्यास गॅसची समस्या दूर होते. बटाटा एल्कलाइनचा उत्तम स्रोत आहे. याचे ज्यूस तयार करण्यासाठी कच्चे बटाटे सोलून त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हे ज्यूस गाळून घ्या आणि त्यामध्ये थोडेसे गरम पाणी टाका. या ज्यूसचे सेवन केल्यास गॅसची समस्या दूर होईल. हे ज्यूस लिव्हरसाठी उपयुक्त आहे.
नारळ पाणी -
नारळ पाणी गॅस समस्येमध्ये औषधाचे काम करते. हे व्हिटॅमिन आणि पोषक तत्वांनी भरलेले असते. पोटात गॅसची समस्या असल्यास दोन-तीन वेळेस नारळाचे पाणी प्यावे. आराम मिळेल.
अद्रक -
गॅसची समस्या असल्यास अद्रक हे एक रामबाण औषधीप्रमाणे काम करते. अद्रक टाकून केलेला चहा पिल्यास आराम मिळेल. अद्रकामध्ये अँटीबॅक्टिरीअल आणि अँटीइंफ्लामेंट्री तत्व आढळून येतात. यामुळे पोटातील गॅसची समस्या त्वरित दूर होण्यास मदत होते. सुकलेल्या अद्रकाचा काढा करून पिल्यास ही समस्या नष्ट होते.


थोडे नवीन जरा जुने