वयाच्या 35 नंतर महिला गरोदर राहिल्यास तुम्हाला या आजारांचा सामना करावा लागेलवाढत्या वयाबरोबरच महिलांची गरोदर राहण्याची शक्यता कमी- कमी होत जाते. जर वाढलेल्या वयात महिला गरोदर राहिल्यास होण्या-या अपत्यास डाउन सिंड्रोम होण्याची दाट शक्यता असते.

तसेच इतरही जेनेटिक कमतरता जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय गर्भवती आईला हाय ब्लड प्रेशर (जर वजन जास्त असल्यास), मधूमेह आणि आरोग्या संबंधी अन्य कठिण समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते.

डाउन सिंड्रोम काय आहे ?


डाउन सिंड्रोम ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे बाळाचा विकास योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे बोलणे, चालणे, एखादी नवीन गोष्ट शिकण्यास तसेच इतरही समस्यांना तोंड देण्याची वेळ येऊ शकते. सिंड्रोम या आजारामुळे बाळाची संपूर्ण वाढ होत नाही. ही मुले मोठी झाल्यावर छोट्या-छोट्या कामांसाठी दुस-यावर अबलंबून राहतात. या मुलांना स्वत:चे स्वत: खाता देखील येत नाही. या मुलांना इतरही आजार पटकन होण्याची दाट शक्यता असते.


डाउन सिंड्रोमपासून वाचण्याचे उपाय

डाउन सिंड्रोम या आजाराचे पूर्ण निदान होत नाही. परंतु सुरवातीपासून घेतलेल्या उपचारामुळे त्यात काही प्रमाणात सुधारणा होवू शकते. यामध्ये बोलण्याची, शाररिक, व्यावसायिक, आणि शैक्षणिक चिकित्साचा सामावेश असतो. प्रतिसाद आणि उपचारानंतर सिंड्रोम आजाराने त्रस्त ब-याच व्यक्ती आनंदी आणि सक्रिय जीवन व्यतीत करू शकतात.
कोणत्या महिलांच्या मुलांना होतो डाउन सिंड्रोम ?

हे जरूरी नाही की वय वाढलेल्या महिलांना होणा-या मुलांनाच सिंड्रोम होतो. हा आजर कमी वयातील महिलांच्या मुलांनाही होण्याची शक्यता असते. पण, त्याची शक्यता फार कमी प्रमाणात असते. वयाच्या 20 व्या वर्षी बाळाला जन्म देणा-या महिलांमध्ये हजारात एखाद्या बाळाला हा आजार होण्याची शक्यता असते.


तर वयाच्या 35 व्या वर्षी जन्म देणा-या महिलांमध्ये हज़ारात 3 बालके या आजाराचे शिकार होतात आणि वयाच्या 40 व्या वर्षी बाळाला जन्म देणा-या महिलांमध्ये 100 पैकी 3 केसेस बघायला मिळतात. वयाच्या 40 व्या वर्षी गरोदर राहणे हे वैद्यकीय दृष्टीकोनातुनही चांगले मानले जात नाही.


थोडे नवीन जरा जुने