ओवर ड्रिंक करणार असाल तर, या गोष्ठी तुमच्यासाठी महत्वाच्यादारू पिणे शरीरासाठी हानिकारक मानले जाते तरीही काही लोक यापासून दूर राहू शकत नाहीत. पार्टीमध्ये ड्रिंक करणे आजकाल अनेकांना आवडते परंतु त्यानंतर होणारा हँगओव्हर डोके आणि मूड दोन्ही खराब करतो.
अल्कोहल घेतल्यानंतर हँगओव्हर होणारच नाही असे फार कमी वेळेस घडते. यामुळे आज आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगतो आहोत, ज्यामुळे अल्कोहलचा प्रभाव तुमच्या शरीरावर जास्त प्रमाणात पडणार नाही. ड्रिंक करण्यापूर्वी तुम्ही या टिप्सचा अवलंब करून हँगओव्हरपासून दूर राहू शकता.

ड्रिंक करण्यापूर्वी नाशपाती फळ खाल्ल्याने नशा कमी चढेल आणि हँगओव्हर कमी होईल. कारण नाशपाती फळ दारूचा प्रभाव 20 टक्क्यांनी कमी करते.

ड्रिंक करण्यापूर्वी रताळे खाणेसुद्धा शरीरासाठी फायदेशीर ठरते कारण हे शुगर लेव्हलला नियंत्रणात ठेवतात.

हिरव्या पालेभाज्यांचे ज्यूस प्यायल्याने होईल फायदा. हे ज्यूस तुमच्या शरीरात व्हिटॅमिन आणि मिनरल्सचे प्रमाण पहिलेच वाढवून ठेवते आणि यामुळे दारूचे साइड इफेक्ट कमी होतात.

भरपून पाणी पिणे तर आवश्यक आहे कारण ड्रिंक केल्यानंतर डिहायड्रेशन होणे सामान्य गोष्ट आहे. यामुळे ड्रिंक करण्यापूर्वीच भरपूर पाणी प्यायल्यास हँगओव्हर त्रस्त करणार नाहीत आणि डोकेही दुखणार नाही.
काकडी खाल्ल्याने डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. यामुळे आधीपासूनच काकडी खाऊन ड्रिंक पार्टीसाठी सज्ज राहू शकता.

थोडे नवीन जरा जुने