तुम्ही अल्सरने पिडीत तर नाही ना ? ही आहेत लक्षणे
अल्सर विविध प्रकारचा असतो - आमाशयचा अल्सर, पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रिक अल्सर. पोटातील पचनसंस्थेच्या आवरणावर निर्माण होणारे व्रण, जखमा म्हणजे अल्सर.

पूर्वी पोषणाची कमतरता, तणाव, अनियमित दिनचर्या या गोष्टींना अल्सरचे प्रमुख कारण मानले जात होते. परंतु नवीन रिसर्चनुसार अल्सर एक प्रकारचा जीवाणू हेलिकोबॅक्टर पायरोली किंवा एच.पायरोली यामुळे होतो.

अल्सरच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. या जीवाणूव्यतिरिक्त काही प्रमाणात असंतुलित आहार आणि आपली अनियमित दिनचर्या या आजाराला आमंत्रण देऊ शकते. आज आम्ही तुम्हाला या आजारापासून दूर ठेवणारे काही घरगुती उपचार सांगत आहोत.

पोहे अल्सरवर एक रामबाण उपाय आहेत, याला बिटन राइस असेही म्हणतात. पोहे आणि बडीशेप समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. 20 ग्रॅम चूर्ण 2 लिटर पाण्यामध्ये सकाळी टाकून ठेवा. त्यानंतर रात्रीतून हे पाणी घ्यावे. हे मिश्रण नियमितपणे सकाळी तयार करून दुपार किंवा संध्याकाळनंतर पिणे सुरु करावे. हे मिश्रण 24 तासात पूर्ण घ्यावे, अल्सरमध्ये आराम मिळेल.


अल्सरच्या उपचारासाठी दररोज 2-3 केळीचे सेवन करावे. तुम्हाला केळी आवडत नसेल तर याचे मिल्कशेक करून घेऊ शकता. केळीचे पातळ स्लाईस तयार करून वाळवून घ्या. त्यानंतर मिक्सरमधून वाळवलेल्या स्लाईसचे चूर्ण तयार करून घ्या. दररोज 2 चमचे चूर्ण आणि एक चमचा मध मिसळून हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस घ्या. एक आठवडा हा उपाय केल्यास अल्सरमध्ये आराम मिळेल.
पत्ता कोबी आणि गाजर समान प्रमाणात घेऊन ज्यूस तयार करून घ्या. हे ज्यूस सकाळ-संध्याकाळ एक-एक कप घेतल्यास पेप्टिक अल्सरच्या रुग्णांना आराम मिळेल.

अल्सरचा त्रास असलेल्या रुग्णांनी गायीच्या तुपाचे भरपूर सेवन कारणे फायदेशीर राहील.


अल्सरच्या रुग्णांनी बदामाचे सेवन करावे. बदाम बारीक करून दुधातून सेवन करावेत. सकाळ-संध्याकाळ हे मिश्रण घेतल्यास अल्सर लवकर ठीक होईल.


शेवगा(ड्रम स्टिक)ची पाने बारीक करून दह्यासोबत पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टचे सेवन दिवसातून एकदा केल्यास अल्सरमध्ये आराम मिळेल.
ताकाची पातळ कढी करून अल्सरच्या रुग्णाला द्यावी. अल्सर पिडीत व्यक्तीला मक्याची भाकरी आणि कढी खाण्यास द्यावी. हा आहार सहजपणे पचतो.


थोडे नवीन जरा जुने