वजन कमी करायचे असेल तर या पदार्थाचे सेवन करा
आळंबी पोषक घटकांचा खजिना असण्यासोबत त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे खाल्ल्याने व्यक्तीच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये लक्षणीयरीत्या वाढ होते.


जगात एक लाख चाळीस हजार प्रकारच्या मशरूम (आळंबी) जाती आहेत. पण आतापर्यंत फक्त 10 टक्के प्रजातींचे गुण संशोधक शोधू शकले आहेत. बुरशीत तयार झालेल्या प्रत्येक जातीच्या आळंबीत गुणांची भरमार असल्यामुळे ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

मी रात्रीच्या जेवणात मशरूम अवश्य घेते. - रोशनी चोप्रा, टीव्ही अभिनेत्री


आरोग्याच्या दृष्टीने काय फायदा ?

वजन नियंत्रणात : एका संशोधनानुसार जर वजन कमी करायचे असेल तर रेड मीट खाणे बंद करून त्याच्याऐवजी व्हाइट बटण मशरूम खाल्ले पाहिजे. याचा फायदा सर्व वयोगटातील व्यक्तींना होतो.


भरपूर पोषक : आहारतज्ज्ञांच्या मते, आहारात मशरूमचा समावेश केल्याने आहारची गुणवत्ता वाढते त्याचप्रमाणे पोषक घटकदेखील मिळतात.

व्हिटॅमिन डीचा स्तर : वाळलेले व्हाइट बटण मशरूम केल्याने व्हिटॅमिन डी 2 किंवा डी 3 चे प्रमाण वाढण्यास मदत होते.


प्रतिकार क्षमता वाढते : मशरूमचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकार क्षमता सक्षम होते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. व्हाइट बटण मशरूम रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यात उपयोगी ठरतात असे या संशोधकातून सिद्ध झाले आहेत.


आजारात उपयोगीअलीकडेच झालेल्या एका संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की मशरूममध्ये अँटी-इफ्लेमेंटरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात. हा खालील आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठी अत्यंत लाभकारक ठरतो-
अस्थमा
अंग आणि हाडदुखी
रेनल फेल्युअर

पक्षाघात


3.6 टक्के वजन कमी होऊ शकते दररोज एक कप पांढर्‍या आळंबी खाल्याने.

10 हजार मशरूमच्या जातींपैकी 50 ते 100 जाती विषारी आहेत. असे मशरूम कधीच खाऊ नयेत.


20 टक्के आहाराचे प्रमाण भरून काढते एक वाटी मशरूम.थोडे नवीन जरा जुने