ही बॅग वापरणे तुमच्यासाठी घातक
फॅशन स्टेटमेंट म्हणून हँडबॅग फार प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेक नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी विविध बॅग वापरतात, परंतु या बॅग आरोग्यावर भार ठरत आहेत.

महिला असो की तरुणी सर्वजण सर्रासपणे बॅगचा वापर करतात. खांद्यावर जास्त भार वाहिल्याने पाठदुखी, मान आणि खांद्याला दुखापत होण्याचा धोका असतो. त्याचा आपल्याला फारसा परिणाम जाणवतही नाही.

1. हँडबॅग
महिलांकडे आता विविध गॅझेट्सची भरमार आहे. त्यामुळे त्यांच्या बॅगचे वजन आणि आकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

काय होतो त्रास : बॅगेचे वजन वाढल्याने बहुतांश महिलांना शरीर रचना, पाठदुखी, पाठीतील लवचीक पेशीची हानी आणि आर्थरायटिससारख्या समस्या होतात.

वापरण्याची योग्य पद्धत : हँडबॅग वापरताना त्यात एक ते दीड किलो वजनापेक्षा जास्त वजन ठेवू नये. एका बंदाच्या बॅगेऐवजी दोन बंदाची बॅग वापरण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे खांद्यावर समप्रमाणात भार पडतो.


2. बॅकपॅक
बहुतांश वेळा लोक ऑफिस किंवा प्रवासात बॅकपॅकचा वापर करतात. बॅकपॅक सुद्धा आरोग्यावर विपरीत परिणाम करते.

काय होतो त्रास : जास्त काळापर्यंत पाठीवर बॅग अडकवून ठेवल्यास फटिंग, स्नायू दुखावणे, माकडहाड दुखणे अशा समस्या होऊ शकतात.

योग्य पद्धत: बॅकपॅकमध्ये सगळीकडे समप्रमाणात भार येईल अशा पद्धतीने साहित्य ठेवावे. बॅकपॅक पुष्ठांचा खाली जाणार नाही याची काळजी घ्यावी. जास्त काळापर्यंत पाठीला बॅग अडकवून ठेवू नये. वेळ मिळेल तेव्हा बॅग खाली ठेवावी.


3. हँडपर्स
हँडपर्समुळे देखील अनेक आरोग्यविषयक समस्या होतील यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण एकसारखे पर्स हातात पकडून ठेवल्यास त्याचा देखील त्रास होतो.

काय होतो त्रास : हातात पर्स धरताना बहुतांश वेळा हात काटकोनात राहतात. त्याचा परिणाम पाठीवर पडतो. स्नायू ताठल्याने डोकेदुखी, पाठ, खांदे आणि हात दुखण्याचा त्रास होतो.

योग्य पद्धत : लांब आणि चेन स्ट्रॅप सारखे हँडपर्स वापरणे टाळा. लहान बंदाच्या हँडपर्स घ्याव्यात. बंदामुळे शरीर रचनेत कोणताही बदल होत नाही. परिणामी त्याचा त्रास होत नाही.


व्हिक्टोरिया बेकहॅमला अलीकडे मान आणि खांदेदुखीचा त्रास झाला होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा त्रास व्हिक्टोरिया वापरत असलेल्या जड बॅगमुळे झाल्याचे निष्पन्न झाले.थोडे नवीन जरा जुने