हार्ट अटॅक येणाची पूर्व लक्षणे माहित आहे का ?
हार्ट अटॅक एक मोठा आजार जो कुठली चाहूल न देता अचानक पुढे उभा राहतो. काही जणांना येणारा हार्ट अटॅक हा कमी तीव्रतेचा असतो तर ब-याच वेळी या आजाराने तुमचे आयुष्य धोक्यात येऊ शकते.

आज ब-याच जणांना हार्ट अटॅक येणाची पूर्व लक्षणे माहित नाही. तर, ब-याच जणांना माहिती असून देखील ते या गंभीर समस्येकडे दूर्लक्ष करतात.

एका नव्या शोधानुसार हार्ट अटॅक येण्याची लक्षणे साधारण एक महिना आधीपासून दिसण्यास सुरुवात होते.
या लक्षणांमध्ये छातील हलके दुखणे, श्वास घेण्यासाठी त्रास, ताप आणि घबराहट होणे.

श्वास घेण्यास त्रास होणे

श्वास घेण्यास त्रास होणे आणि थकवा जाणवणे असे झाल्यास शरीराला आरामाची गरज असते. परतु हे लक्षण हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हार्ट अटॅकचे असण्याची शक्यता असू शकते.थकवा आणि श्वास घेण्याचा त्रास जास्त करुन महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अटॅक येण्याच्या काहि दिवस आधी हे लक्षणं दिसतात.


अति घाम येणे -

कमी काम करुन देखील जास्ती घाम येणे हे देखील अटॅक येण्याचे पूर्व संकेत आहे. तुम्हाला जर खुप जास्त प्रमाणात घाम येत असेल तसेच त्वचा चिकट असल्याचा अनुभव होत असेल तर लगेच डॉक्टराचा सल्ला घ्यावा.


मळमळ आणि उल्टी

हार्ट अटॅक येण्याआधी हलके अपचन आणि मळमळ होण्याच्या लक्षणांना दूर्लक्षीत केले जाते. हार्ट अटॅक येण्याची समस्‍या साधारणपणे मोठ्या व्यक्तींमध्ये बघण्यास मिळते. मोठ्या व्यक्तींमध्ये अपचन होण्याचा त्रास जास्त असतो. पोटात दुखणे, अपचन, उल्‍टी हे लक्षणे हार्ट अटॅकची असू शकतात.


छातीत दुखणे आणि घबराहट...

हार्ट अटॅकचे सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे. काही व्यक्तींना बिल्कुल देखील छातीत दुखण्याचा त्रास जाणवत नाही. छातीत बेचैनी, ताण, दुखणे, छातीत अखडल्या सारखे वाटल्यास लगेच डॉक्टरांकडून तपासून घ्यावे.


शरीराच्या इतर भागांमध्ये दुखणे -

शरीराचा एखादा अवयव दुखणे अथवा अखडू शकते. यामध्ये कंबर, मान, जबड्यांमध्ये त्रास होण्याची शक्यता असते. कधी-कधी हा त्रास शरीराच्या इतर भागांमध्ये सुरु होऊन हृदयापर्यंत जाऊ शकते.

चिंता
शरीरावर येणारा अतिरिक्त ताण आणि चिंता देखील हार्ट अटॅकला करण ठरु शकते. रात्री झोपण्यासाठी त्रास होणे, झोपल्यानंतर चिंता, संकट येण्याची भावना अचानक झोपेतून उठणे ही हृदयविकाराची लक्षणे आहेत.

पल्‍स आणि हृदयाचे ठोके वाढने -
कधी-कधी हार्ट अटॅक येण्याआधी पल्‍स आणि ठोक्याच्या हालचालींमध्ये अचानक वाढ होते. असे लक्षण लक्षात आल्यास लगेच डॉक्टरांकडे जावे.


थोडे नवीन जरा जुने