जाणून घ्या तुमच्या नखातच दडलंय काय दडलंय ?अनेकदा आपल्या नखांत होणार्‍या बदलांकडे आपण दुर्लक्ष करतो. खरे तर ही नखे आरोग्याच्या बदलांना व मूलभूत समस्यांनाही प्रतिबिंबित करत असतात.
नखांवर आडवी स्ट्रिप दिसून आल्यास व्यक्तीला ट्रॉमा, तणाव, दीर्घ आजार, चयापचयासंबंधी विकाराशी झुंजावे लागले असण्याची शक्यता असते. आजार नियंत्रणात आल्यास, नखांची सर्वसाधारण वाढ होऊ लागते. हे संशोधन त्वचारोग तज्ज्ञ डॉ. जेसिका कांत यांनी केले आहे.
जाणून घ्या, नखांशी संबंधित काही खास गोष्टी -
निळसर नख :
नखांवर निळाई येण्याचा अर्थ ऑक्सिजनरेटेड रक्ताचा पुरवठा कमी होत आहे. फुप्फुसे तुमच्या सर्व शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा करण्यास अक्षम असल्याचे हे निदर्शक आहे.

पांढरे डाग :
नखांवर पांढरे डाग अनेक विकारांचे लक्षण आहे. विशेषत: यकृतासंबंधीचे आजार संभवतात.

नख तुटणे किंवा निघणे :

नखे जास्त कठीण असूनही तुटत असतील तर हे शरीरातील शुष्कतेचे प्रमाण वाढल्याने असे होते.

पातळ नख :

शरीरात लोहाची कमतरता असल्यास नखे पातळ, पिलिंग किंवा चमच्यासारख्या आकाराची होतात.

काळसर नख :
त्वचेच्या कर्करोगाची शक्यता असेल तर नखांच्या तळाशी काळपटपणा येतो. असे दिसल्यात तत्काळ डॉक्टरांना दाखवा.


थोडे नवीन जरा जुने