केळीचे असेही फायदे जाणून घ्या
केळी या फळाबद्दल तुम्ही जेवढे जाणून घ्याल तेवढे कमीच आहे. कारण जवळपास 10,000 वर्षांपासून केळी हा मानवी जिवनाचा अविभाज्य घटक आहे.जगातील अनेक देशांमध्ये केळीची शेती केली जाते. अनेक लोक केवळ याला एक शक्ती देणारे फळ म्हणूनच खातात. मात्र या फळाच्या इतर फायद्यांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

केळी हे औषधी फळ आहे. अनेक आजारांसाठी केळीचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला केळीच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत.

केळीमध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्त वाढण्यासोबतच शरीराला बळ मिळते.

केळीमध्ये मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात असते. यामुळे कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांसाठी केळी उपयुक्त आहे. तसेच शरीरातील नसांमध्ये यामुळे रक्त गोठत नाही.

लहान मुलांसाठी केळी हे एक उत्तम आणि पौष्टीक फळ आहे. अतिसाराच्या आजारापासून वाचवण्यासाठी मुलांना केळी खायला द्यावी

कच्च्या केळीमध्ये दूध टाकून लावल्याने त्वचा उठावदार दिसते आणि चेहर्‍यावरही चमक येते.

अल्सर आणि पोटाच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी केळी खाणे चांगला पर्याय आहे.
दुधासोबत केळी खाल्ल्याने काही दिवसातच याचा शरीरावर चांगला प्रभाव दिसून येतो.

रोज सकाळी एक केळी आणि एक ग्लास दूध पिल्याने वजन नियंत्रित राहते. तसेच सारखे-सारखे भूक लागत नाही.
पित्ताच्या आजारासाठीवरही केळी उपयुक्त आहे.

गर्भावस्थेत महिलांना केळी खाणे आवश्यक आहे. कारण यामध्ये विटामिन मोठ्या प्रमाणात मिळते.

मळमळ होत असल्यास एका वाटीत पिकलेली केळी फेटून त्यात एक चमचा मिश्री अथवा साखर आणि एक छोटी विलायची बारीक वाटून खावी. लगेच आराम मिळतो.

केळ्याच्या सालीच्या पांढर्‍या भागातील रसाच्या नियमित सेवनाने मधूमेहाच्या आजारापासून हळूहळू सुटका होते.

जेवण झाल्यानंतर केळी खाल्याने जेवण लवकर पचते.


कच्च्या केळामध्ये स्टार्च असते. ज्यामुळे पचनक्रीया हळू करते. त्यामुळे अतिसार झालेल्याला हिरवी केळी दिल्याने अतिसार थांबण्यास मदत होते.

अनेक रासायनिक आणि कृत्रिम औषधींच्या सेवनानंतर तोंडात फोड येण्याची शक्यता असते. अशावेळी कच्च्या केळीचे चुर्ण बनवून घ्यावे. हे चूर्ण तोंडातील फोडांवर लावावे. यामुळे तोंडातील फोड लगेच कमी होतात.

आधुनिक संशोधनानुसार कच्च्या केळीमध्ये फ्लेवॉनॉईड रसायन ल्युकोसायनिडिन आढळते. हे रसायन तोंडातील फोडांवर एक चांगला उपाय आहे.
पुरस्थ रुणांना केळ्याच्या सालीचे चूर्ण करून दररोज कमीत कमी 2 ग्रॅम द्यावे. यामुळे पुरस्थ ग्रंथींच्या वाढीला थांबवण्यास मदत होते.

केळीच्या झाडातील पांढरा भाग मुतखडा होण्यापासून थांबवू शकतो. आधुनिक संशोधनानुसार झाडाचा हा भाग शरीरात ऑक्सेलेट बनण्यापासून थांबवतो.


केळी जास्त प्रमाणात खाणार्‍या लोकांना अल्ट्राव्हायलेट किरणांचा प्रादूर्भाव कमी प्रमाणात होतो.

केळीच्या मुळांमध्येही रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्याची शक्ती असते. बाजारात उपलब्ध असलेल्या ग्यायबेन्क्लामाईड अशा औषधांच्या तुलनेत या मुळांचा उपचार जास्त प्रभावी आहे. यामुळेच केळी मधूमेहाच्या आजाराला नियंत्रित ठेवू शकते.

पिकलेली केळी, जी जवळपास संपूर्णच पिकली आहे ती जखमेवर लावावी. जखमी पटकन सुखते.
थोडे नवीन जरा जुने