जाणून घ्या फळांच्या आणि भाज्यांच्या सालींमध्ये कोणते गुणकारी तत्व असतात...
पालेभाज्या किंवा फळभाज्या आणि फळ अनेक पोषक तत्वयुक्त असतात. म्हणून डॉक्टर प्रकृती तंदरूस्त बनवण्यासाठी भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. परंतु कदाचितच काही लोकांना ठाऊक असेल, की केवळ फळ आणि भाज्यांमध्ये नव्हे, तर त्यांच्या सालीमध्येसुध्दा गुणकारी पोषक तत्व असते.

या सालींचा उपयोग केल्यास अनेक आजार त्यापासून बरे होऊ शकतात. जर तुम्हीसुध्दा या फळांच्या आणि भाज्यांच्या या गुणांपासून अज्ञान असाल तर जाणून घ्या फळांच्या आणि भाज्यांच्या सालींमध्ये कोणते गुणकारी तत्व असतात...

खरबूजाची साल खाल्ल्यास बद्धकोष्ठता दूर होते.

जर कपाटाला लागलेल्या किडमुळे तुम्ही त्रस्त असाल तर कारल्याची साल कपाटात ठेवा.
बटाट्याची साल चेह-यावर लावल्यास चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात.

ज्या महिलांना मासिक पाळीमध्ये जास्त रक्तश्राव होत असेल तर त्यांच्यासाठी डाळिंबाची साल सर्वात फायदेशीर आहे. डाळिंबाची साल सुकवून तिची पावडर बनवा आणि एक ग्लास पाण्यात एक चमचा पावडर टाकून प्या.

डळिंबाची सालीच्या दोन चमचे पावडरमध्ये थोडा गुळ घालून त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. त्याचे काही दिवस सेवन केल्यास मुळव्याधपासून लवकरच आराम मिळेल.

डाळिंबाची साल तोंडात ठेऊन चोखल्यास खोकला कमी होतो.


डाळिंबाची साल बारिक करून त्यामध्ये दही घालून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावल्यास केस सिल्की होतात.

बदामची साल आणि बाभळीच्या शेंगाची साल आणि बिया जाळून बारिक करा. या मिश्रणामध्ये थोडे मीठ टाकून मंजन बनवा. यामुळे दाताचे दूखणे दूर होते.


भोपळ्याची साल बारिक करून पाण्यासह प्यायल्यास डायरियापासून सुटका मिळते.

लिंबूची साल दातावर घासल्यास दात चमकदार होतात.

लिंबूची साल बुटांवर घासल्यास आणि काहीवेळ उन्हात ठेवल्यास बुटांची चमक वाढते.

लिंबू आणि संत्र्याची साल सुकवून, त्याचे चुर्ण बनवून त्याचे दातांसाठी मंजनप्रामाणे वापर केल्यास दात चमकदार बनतात.


पपईची साल सौंदर्या वाढवण्यास मदत करते. त्वचेवर लावल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. टाचांवर लावल्यास टाचेला कोमलपणा येतो.

केळीची साल हलक्या हाताने चेह-यावर पाच मिनिटांपर्यत घासल्याने पिंपल्स दूर होतात. याच्या सालीची पेस्ट बनवून लावल्यास चेह-याची कोमलता वाढते.

केळीची साल दातांवर घासल्यास दात चमकदार होतात.


जेव्हा एखादा किडाने तुमचा चावा घेतला तर त्या ठिकाणी केळीची साल घासून लावल्यास आराम मिळतो.
सोराइसिस झाल्यास केळीची साल घासून लावल्यास त्वचेवरील दाग नष्ट होतात.

लेदर बॅग, बेल्ट किंवा बुटांचा रंग फिका दिसायला लागल्यास त्यावर केळीची साल घासा त्यांना चमक येते.


जर तुम्ही सुरकुत्यांमुळे त्रस्त असाल तर अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये केल्याची सालीची पेस्ट मिसळून चेह-यावर लावा. यामुळे सुरकुत्या नष्ट होतात. ही पेस्ट चेह-यावर 5 मिनीट चेह-यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धूवा.

शरीराच्या कोणताही अवयव दुखत असेल तर त्या ठिकाणी केळीची साल ठेऊन 30 मिनीट तशीच ठेवा, दुखण्यापासून आराम मिळेल.


संत्र्याच्या सालीमध्ये क्लिजिंग, अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे पिंपल्स आणि पुरळ नष्ट होण्यास मदत होते. संत्र्याची साल सुकवून त्याची पावडर दह्यामध्ये मिसळून त्वचेवर लावल्यास त्वचा कोमल होते.

संत्र्याची साल बेसन पिठामध्ये एकत्र करून लावल्यास तेटकट त्वचेच्या लोकांना त्याचा विशेष फायदा होतो. यामुळे पिंपल्स नष्ट होतात.


संत्र्याच्या सालीमध्ये पचनशक्ती वाढवण्याची क्षमता असते. यामुळे पचनशक्तीमध्ये सुधार होते, गॅस, उलटी आणि हृदयाचे आजार दूर करण्यास मदत करते. भूक वाढते आणि मळमळीपासून आराम देते.

संत्र्याची साल ताप कमी करण्यास मदत करते. म्हणून हे सर्व असलेल्या लोकांना संत्र्याची साल बारिक करून खायला दिल्यास त्याचा फायदा होतो.


जर तुमचे केस खूप रुक्ष दिसत असतील ते संत्र्याची साल तुमच्यासाठी एक वरदानच आहे. संत्र्याची साल बारिक करून केसांमध्ये लावल्यास काहीवेळ ठेवा नंतर केस धुवून घ्या. तुमचे केस सिल्की होतील.

संत्र्याची साल बारिक करून त्यामध्ये गुलाब जल टाकून चेह-यावर लावल्यास चेह-यावरीन काळे डाग कमी होतील.


एक संशोधनानुसार, जर एखाद्या व्यक्तीला कॉलेस्ट्रॉलची समस्या असेल, तर त्याच्यासाठी संत्र्याची साली एक उपोयोगी औषधी सिध्द होऊ शकते.

संत्र्याची साल कर्करोग आणि हाडांच्या दुखण्यासारख्या आजारांवर विशेष रुपात लाभदायक असते.

मोसंबीच्या सालीमध्ये एक विशेष प्रकारचा सुगंध असलेले तेल असते. या तेलाचा उपयोग मज्जातंतूना आराम देण्यास आणि शांत झोप लागण्यासाठी केला जातो. आंघोळीच्या पाण्यात याचे दोन-तीन थेंब तेल टाकून आंघोळ केल्यास शांत झोप लागते.थोडे नवीन जरा जुने