एकटेपणा मोठ्या प्रमाणात घातक ठरू शकतो वाचा
घटस्फोट, साथीदाराचा मृत्यू किंवा अविवाहित राहिल्यामुळे अनेकांच्या जीवनात एकटेपणा येतो. एकटेपणा व्यक्तीला आतल्या आत खात कमकुवत करत असतो. अशावेळी आरोग्याची जोखीमसुद्धा वाढते.

वाढत्या वयासोबत आरोग्य बिघडणे ही सामान्य बाब आहे, परंतु अशा स्थितीत व्यक्ती एकटी असेल तर त्याचा शारीरिक आणि मानसिक परिणाम जास्त कष्टदायी असतो.

शरीर आणि मनासाठी धोकादायक


एकटेपणामुळे आरोग्यविषयक त्रासांबरोबर सामाजिक संबंधांवर वाईट परिणाम होतात असे हेल्थ अँड रिटायरमेंट स्टडीजने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या संस्थेने 2100 लोकांचे निरीक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष काढला. जे लोक आपल्या कुटुंबासोबत राहतात, ज्यांचे अनेक मित्र आहेत आणि सार्वजनिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात त्यांना अशा समस्येचा सामना करावा लागत नाही.


कमी होते स्मरणशक्ती

एकटेपणामुळे पीडित व्यक्ती भावनात्मकदृष्ट्या दुर्बल होते. अशावेळी तो विनाकारण कोणत्याही गोष्टीची काळजी करत राहतो किंवा तणावात वावरतो. वयासोबत ब्रेनसेल्स नष्ट होत असतात. या स्थितीत इतरांसोबत फारसा संबंध न राहिल्यास स्मरणशक्ती कमी होत जाते. अaशाने मेमरी लॉस होण्याचा धोका असतो.


लठ्ठपणा वाढतो
60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 1 कोटी 40 लाख लोकांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, यातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्ती एकटेपणा दूर करण्यासाठी टीव्ही पाहणे पसंत करतात. संशोधकांना असे आढळून आले की एकटेपणामुळे पीडित लोकांना धूम्रपान आणि दारूचे व्यसन लागते. या व्यसनांमुळे लठ्ठपणा वाढीस लागतो.

थोडे नवीन जरा जुने