आरोग्यात होतील 'हे' चमत्कारिक बदल हे घरगुती करा
आरोग्याच्या लहान-लहान समस्या आपणा सर्वांनाच उद्भवत असतात. काही घरगुती उपाय केल्याने या समस्या सहज दूर होतात. फक्त योग्य उपाय माहिती असणे गरजेचे असते. यासाठी आम्ही तुम्हाला काही रामबाण उपाय सांगणार आहोत. वाचा हे फायदेशीर उपाय...

1. संत्रीच्या सालांना वाळवून त्यांचे चुर्ण तयार करा. हे चुर्ण गुलाबजलमध्ये मिक्स करुन चेह-यावर लावा. चेह-यावरील पिंपल्स आणि डाग दूर होतात.

2. त्वचा कोरडी आणि निर्जीव झाली असेल तर ज्वारीचे पीठ, हळद, मोहरीचे तेल पाण्यात मिक्स करुन पेस्ट तयार करा. या पेस्टने नियमित शरीराची मालिश करा आणि कोमट पाण्याने अंघोळ करा. यासोबतच दूधात केसर टाकून सेवन करा, तुमचे रुप उजळेल.

3. डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी अमरवेलचा रस तयार करा आणि एक आठवडा नियमित डोक्याला लावा. असे केल्याने तुमचा कोंडा तर दूर होईलच यासोबतच तुमचे केस गळणे बंद होईल.

4. जर तुमची जखम पिकली असेल तर धोत-याच्या पानावर मोहोरीचे तेल लावा आणि ते पान जखमेवर लावा. असे केल्याने तुमची जखम लवकर चांगली होईल.

5. संधीवाताची समस्या दूर करण्यासाठी एका दिवसात 8-9 केळी खावी. असे 3-4 दिवस करा, तुमची संधीवाताच्या वेदना कमी होतील.

6. सकाळी उपाशापोटी व्हीट-ग्रासचा ज्यूस उपाशापोटी प्यायल्याने चेह-याची चमक वाढते आणि रक्त स्वच्छ होते.


7. खोब-याच्या तेलामध्ये लिंबूचा रस मिक्स करुन केसांना लावल्याने कोंडा आणि केसांचा कोरडेपणा दूर होतो.

8. केसांतील कोंडा दूर करण्यासाठी अजून एक सोपा उपाय म्हणजे, मेथीच्या दाण्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट अर्धा तासासाठी केसांमध्ये लावा. केस धुवून घ्या आणि कॉटनच्या कापडाने केस कोरडे करा. कोंडा दूर होईल.


9. आम्लपित्त आणि एसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी धने, जीरा आणि साखर तिन्हीही एकत्र करुन सेवन करा.

10. रोज सकाळी लसणाच्या 1-2 पाकळ्या न चावता सेवन केल्याने जॉइंट पेनमध्ये आराम मिळतो.थोडे नवीन जरा जुने