खोबरे तेलामध्ये असलेले इतर अनेक गुण आरोग्यासाठी फायदेशीरखोबरेल तेल केसांसाठी चांगले तर आहेच, परंतु त्वचेलाही या तेलाचा खूप फायदा होतो. यामध्ये असलेले इतर अनेक गुण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. फक्त हे तेल शुद्ध असले पाहिजे.
वजन कमी करण्यासाठी :
वनस्पती तेल किंवा मक्याचे तेल यासारख्या इतर तेलांमध्ये एलसीटी (लाँग चेन ट्रिग्लीसराइड्स) हा पदार्थ असतो. हाच पदार्थ फॅटच्या रूपात शरीरात जमा होतो, परंतु खोबरेल तेलात हा पदार्थ नसतो. त्यामुळे या तेलात बनवलेले पदार्थ खाल्ल्याने आपल्याला अधिक ऊर्जा मिळते आणि कॅलरी इनटेकही कमी होतो. तसेच यामुळे आपल्या शरीरात अतिरिक्त फॅट जमा होणार नाही.


तणावमुक्तीसाठी :

खोबरेल तेल अत्यंत आरामदायक असते. त्यामुळे हे त्वचेसाठी उपयुक्त मसाज ऑइल मानले जाते. खोबरेल तेलाने हलक्या हाताने केलेली डोक्याची मालिश केसांसाठीच चांगली असून यामुळे मानसिक थकवादेखील दूर होतो. खोबरेल तेलाचा नैसर्गिक सुगंधही खूप चांगला असतो. त्यामुळे हे तेल तणावमुक्त राहण्यासाठी खूप फायदेशीर आहे.


अकाली वृद्धत्व येत नाही :

खोबरेल तेलात असलेल्या एमसीटी (मीडियम चेन ट्रिग्लीसराइड्स) च्या छोट्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमुळे हे तेल त्वचा सहजपणे शोषून घेते. त्यामुळे खोबरेल लावल्याने त्वचा नरम आणि मुलायम होते. एवढेच नाही तर हे तेल त्वचेच्या टिश्यूजना मजबुती देते आणि सुरकुत्याही लवकर येत नाहीत. यामुळे त्वचेची रिपेअरिंग प्रॉपर्टीदेखील मजबूत होते.

खोबरेल तेलाचे इतर फायदे -


मेकअप रिमूव्हर

रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍याचा मेकअप काढण्यासाठी एखाद्या क्लिंजरऐवजी खोबरेल तेलाचा वापर केला पाहिजे.


ओठांसाठी उपयुक्त

खोबरेल तेल लावल्याने ओठ नरम आणि मुलायम होतात. त्यात चमक ही येते.


चांगले मॉइश्चरायझर

खोबरेल तेल चांगले मॉइश्चरायझर आहे. यामुळे त्वचा दीर्घ काळापर्यंत कोरडी राहत नाही.


टूथपेस्ट

खोबरेल तेल बेकिंग सोड्यात मिसळून त्याचा टूथपेस्ट म्हणून वापर केल्यास दात मोत्यांप्रमाणे चमकतील.थोडे नवीन जरा जुने