मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास थकवा दूर होईल अजूनही काही फायदे
मोहरीच्या तेलाचा वापर जेवणात करा किंवा औषधाच्या रुपात. हे प्रत्येक रुपात फायदेशीर ठरते. मोहरीच्या तेलात असे अनेक पोषकतत्त्व असतात जे आपल्या आरोग्य, केस आणि स्किनवर फायदेशीर असतात.

यामुळेच मोहरीच्या तेलाचा वापर प्राचीन काळापासुन खाण्यासाठी व शरीरावर लावण्यासाठी केला जात आहे. परंतु खुप कमी लोकांना माहिती आहे की,
मोहरीचे तेल पेनकिलरचे काम देखील करते. आज आम्ही तुम्हाला मोहरीच्या तेलाचे काही रामबाण उपाय सांगणार आहोत...

1. मोहरीच्या तेलामध्ये वेदानाशामक गुण आढळून येतात, कान दुखत असल्यास दोन थेंब कोमट मोहरीचे तेल कानात टाकावे. यामध्ये दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकू शकता.

2. मोहरीच्या तेलाने सौंदर्य वाढते. गोरा रंग प्राप्त करू इच्छित असलेल्या लोकांनी डाळीचे पीठ, हळद यामध्ये मोहरीचे तेल टाकून पेस्ट तयार करून ती चेहऱ्यावर लावावी.

3. मोहरीचे तेल हृदयाला तंदुरुस्त ठेवते काही दिवसांपूर्वी एम्स, हावर्ड स्कूल ऑफ मेडिकल सायन्स आणि सेंट जॉन मेडिकल कॉलेजमध्ये केलेल्या एका रिसर्चनुसार मोहरीचे तेल खाणाऱ्या 71 टक्के लोकांना हृदयाचे आजार झाले नाहीत.

4. संधीवाताने त्रस्त असाल तर मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मालिश केल्यास वेदना कमी होतील.

5. कंबर दुखीचा त्रास असल्यास मोहरीच्या तेलामध्ये थोडासा हिंग, ओवा आणि लसुन मिसळून गरम करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण कंबरेवर लावा. या उपायाने कंबर दुखीचा त्रास कमी होईल.


6. नवजात शिशूची मोहरीच्या तेलाने मालिश करणे उत्तम राहते. मोहरीच्या तेलाने मालिश केल्यानंतर स्नान घातल्याने बाळाला सर्दी होण्याची शक्यता राहत नाही आणि सर्दी झालेली असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास सर्दी दूर होईल.

8. चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स, सुरकुत्या पडल्या असतील तर मोहरीचे तेल अत्यंत उपयुक्त आहे. या तेलाने मालिश केल्यास त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होतील आणि चेहरा उजळेल.


9. मोहरीच्या तेलामध्ये मेंदी पावडर मिसळून थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर तेल गाळून ते केसांना लावल्यास केस गळणे कमी होईल.

10. मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास रक्त वाढते. शरीरात उत्साह, स्फूर्ती राहते. यामुळे शारीरिक थकवासुद्धा दूर होतो.थोडे नवीन जरा जुने